मंगळवेढा : सामाजिक राजकीय व गुणात्मक परिवर्तनाची मशाल, सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून परिपूर्ण करण्यासाठी शिक्षण हे प्रभावशाली माध्यम असल्याचे प्रतिपादन आ.समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
स्व महादेवराव बाबुराव अवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने 10 वी व 12 वी परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या तसेच पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व स्कुलबॅग मान्यवरांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थस्थानी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे हे होते.यावेळी श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम,
शिक्षणाधिकारी संजय जावीर,जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर,लेबर फेडरेशनचे संचालक सरोज काझी,सोमनाथ आवताडे, चंद्रकांत पडवळे, दादासाहेब ओमणे, दामाजीचे संचालक अशोक केदार,भारत निकम,
स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे, खंडू खंदारे, दादासाहेब डोंगरे आदी मान्यवर व तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी बोलताना
आ.आवताडे म्हणाले की,कौशल्यपूरक शिक्षण घेऊन आपल्या व्यक्ती जीवनाचा लौकिक समृद्ध करा आणि आई-वडीलांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना जागृत करावी, तालुक्यातील सामाजिक,
राजकीय, धार्मिक, अध्यात्मिक व शैक्षणिक आदी सेवा क्षेत्रामध्ये समाजपयोगी उपक्रम राबवून या प्रतिष्ठानने नेहमीच सामाजिक सेवेची परंपरा जतन केल्याचे सांगितले.अपर जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आभासी जगातील गोष्टींच्या आहारी जाऊन आपला अनमोल वेळ वाया घालवू नका व आपल्या स्वप्नांपासून दूर जाऊ नका.
मानवी आयुष्यातील सर्वात दमदार आणि मजबूत काळ म्हणजे तारुण्य असल्यामुळे आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी व आकार देण्यासाठी हा अतिशय सर्वोत्तम कालखंड आहे. जगामध्ये ज्यांनी यशाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली त्यांनी गतकाळामध्ये खूप मोठा संघर्ष केला आहे.
त्यामुळे यशाला शॉर्टकट न शोधता आपले प्रयत्न सातत्यपूर्ण मार्गाने कायम ठेवून यश आपल्या पदरात पाडून घ्या.प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर म्हणाले की,दहावी - बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी आपली शाखा निवड करताना आपली शैक्षणिक आवड लक्षात घेऊन करिअर निवड करा.
प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विविध पैलू उलगडून सांगताना त्यांच्या यशाची संघर्षगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. इतरांशी स्पर्धा न करता आपणच आपल्याशी स्पर्धा करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विधायक मार्गाने विकास केला पाहिजे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी व सातत्य यांची खूणगाठ मनाशी बांधून आपले स्वप्न साकार करण्यासाठी चांगल्या गोष्टी आत्मसात करा आणि आई-वडीलांचे नाव उज्वल करा असा सल्ला दिला. प्रास्ताविक अशोक केदार यांनी तर एच.आर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.