MLA Sanjay Mama Shinde. 
सोलापूर

कार जळीत दुर्घटनेतील संजय शिंदे मी नव्हे... मी घरी सुखरुप : आ. संजयमामा शिंदे

आण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : नाशिकमध्ये गाडीला लागलेल्या आगीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय चंद्रभान शिंदे यांचा (ता.13) ऑक्टोबर रोजी होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र अनेक वृत्तवाहिन्या आणि वेबसाईट्सनी बातमी प्रसारित करताना करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो वापरला. त्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी मी सुखरुप असून नजरचुकीने बातमीत माझा फोटो वापरल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरही पोस्ट केली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ साकोरे मीग (निफाड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय चंद्रभान शिंदे यांच्या गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. संजय शिंदे हे नाशिकमधील द्राक्षांचे व्यापारी आहेत. द्राक्षांच्या बागेसाठी किटकनाशके  आणण्यासाठी ते पिंपळगावला निघाले होते. कडवा नदीवरील ओव्हरब्रिजजवळ असताना त्यांच्या गाडीत बिघाड झाला. शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीला आग लागली. कारमध्ये असलेल्या सॅनिटायझरमुळे आग आणखीच भडकली. शिवाय कारचा सेंट्रल लॉक लागल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

माञ काही ठिकाणी बातम्या दाखवताना करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो वापरला. आमदार संजयमामा शिंदे यांनी जरी अपक्ष निवडणूक लढवली असली तरी त्यांना राष्ट्रवादीचा पाठींबा होता. शिवाय त्यांनी माढा लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. मृत्यू पावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय चंद्रभान शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या नावातील साम्य व राष्ट्रवादीशी असलेले संबंध यामुळे बातमी दाखवताना वाहिन्या व वेब पोर्टल यांच्याकडून झालेली गफलत याचा परिणाम करमाळय़ाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याविषयी बरे वाईट झाले की काय? असा गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये पसरल्याने आमदार संजयमामा शिंदे यांनी आपण आपल्या घरी निमगांव(टे) ता.माढा येथे सुखरूप असल्याचे सांगितले असून तशा आशयाची फेसबुक पोस्ट केली आहे. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT