बिबट्याला त्वरित जेरबंद करा ! Canva
सोलापूर

बिबट्याला त्वरित जेरबंद करा! आमदार विजयकुमार देशमुखांची सूचना

बिबट्याला त्वरित जेरबंद करा ! आमदार विजयकुमार देशमुखांची सूचना

अरविंद मोटे

चिंचोळी एमआयडीसी परिसरात मंगळवारी (ता. 27 जुलै) काही कामगारांना बिबट्यासदृश प्राणी आढळला होता.

सोलापूर : चिंचोळी एमआयडीसी (Chincholi MIDC, Solapur) परिसरात मंगळवारी (ता. 27 जुलै) काही कामगारांना बिबट्यासदृश (Leopard) प्राणी आढळला होता. याची माहिती मिळताच वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर चिखलात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले होते. त्या दिवसापासून गस्त पथक तैनात असूनही अद्याप बिबट्याचा ठवठिकाणा लागलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) यांनी त्या परिसराला भेट देत तज्ज्ञ अधिकाऱ्यास पाचारण करून बिबट्याला त्वरित जेरबंद करा, अशा सूचना दिल्या आहेत.

मागीत सात दिवस या परिसरात वन विभाग गस्त घालत असून पाणवठ्यांवर कॅमेरेही लावलेले आहेत. मात्र, अजूनही बिबट्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. वन विभागाकडून नागरिकांसाठी सावध राहण्याचे व अफवा न पसरवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सोमवारी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी कोंडी येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एमआयडीसी भागात नागरिक कामासाठी ये-जा करत असतात आणि या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहेत. त्यामुळे त्या परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्याला त्वरित जेरबंद करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष देऊन बिबट्या पकडण्याचा प्रयत्न करावा आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांना बोलावून बिबट्याला जेरबंद करावे, अशा सूचना श्री. देशमुख यांनी दिली.

कोंडी येथे एमआयडीसी एरिया आहे, तेथे येणाऱ्या कामगारांनी व त्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर जाताना हातामध्ये टॉर्च ठेवावा. एकट्याने कुठेही फिरू नये. घराबाहेर रात्रीचे झोपू नये. लहान मुले घराबाहेर खेळत असतील तर त्यांच्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे, असे आवाहन अतिरिक्त वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार यांनी केले आहे. या वेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनपाल शंकर कुताटे, वनरक्षक यशोदा आदलिंगे, वनरक्षक अनिता शिंदे, शुभांगी कोरे, बापू भोई, कृष्णा निरवणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले, भरत पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नीळ, उद्योजक संजय पवार, सुरेश राठोड, उपसरपंच किसन भोसले, राजेंद्र भोसले, प्रसाद निळे, राजाभाऊ आलूरे, लक्ष्मण साबळे, मनोज निंबाळकर, अजित सय्यद, पोलिस पाटील मधुकर शिंदे, ग्रामसेवक श्री. कांबळे, सुदर्शन माळी, सोमनाथ राऊत, प्रकाश भोसले, पप्पू यमगर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT