Mohol assembly election 2024  sakal
सोलापूर

Mohol Assembly Election 2024 :ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांची मतदारसंघांवर नजर

Mohol VidhanSabha Election 2024 : मोहोळ विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस व महसूल प्रशासनाचे एकूण ६२५ पोलिस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : मोहोळ विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस व महसूल प्रशासन सज्ज झाले असून, एकूण ६२५ पोलिस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. यंदा प्रथमच मतदारसंघांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून ४५ जणांना तडीपार केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी एक हजार ८०० कर्मचारी तैनात केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली.

मोहोळ विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी ३५० पोलिस कर्मचारी व २७५ होमगार्ड यांचा मतदान केंद्रांवर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलिसांची राज्य राखीव तुकडीही तैनात करण्यात आली आहे.

या सर्वांवर नियंत्रणासाठी एक उपविभागीय पोलिस अधिकारी, दोन पोलिस निरीक्षक, १७ पोलिस उपनिरीक्षकांची नियुक्ती केली आहे. एखादा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी १५ फिरती गस्त पथके तैनात केली असून, त्यात ७५ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. घटनास्थळी तातडीने पोचण्यासाठी शीघ्र कृती दल व दंगा काबू पथकही सज्ज ठेवले आहे. कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये तसेच मतदान प्रक्रियेला बाधा येऊ नये म्हणून मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरातील विविध व्यावसायिकांना व घरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. आज (मंगळवारी) रात्रीपासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत सर्वत्र ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांची नजर असणार आहे. कुठे गर्दी आहे, कुठे विनाकारण नागरिक थांबले आहेत हे पाहण्यात येणार आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. सर्व नागरिकांनी मतदान करावे व प्रशासनाला सहकार्य करावे.

- सुरेश कुमार राऊत, पोलिस निरीक्षक, मोहोळ

- मतदानाची पूर्ण तयारी झाली आहे. प्रत्येक बूथवर महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रे व लागणारे अन्य साहित्य पोच केले आहेत. उद्या सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरवात होणार आहे. सर्वांनी आवर्जून मतदान करावे.

- सीमा होळकर, निवडणूक निर्णय अधिकारी, मोहोळ विधानसभा मतदारसंघ

महसूल प्रशासनही सज्ज

मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एक हजार ८०० कर्मचारी नियुक्त केले असून, त्यांना तीन प्रशिक्षणे दिली आहेत. मतदान साहित्य व कर्मचारी ने-आण करण्यासाठी ४९ एसटी बस व २१ जीपगाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अचानक एखाद्या मतदान यंत्रात बिघाड झाल्यास तातडीने त्या ठिकाणी दुसरे यंत्र बसविण्यासाठी ६४ मतदान यंत्रे राखीव ठेवली आहेत. मतदान प्रक्रिया कशी चालली आहे, हे पाहण्यासाठी १६८ मतदान केंद्रांवर वेब कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचे नियंत्रण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात आहे.

दहा गावांची आदर्श मतदान केंद्र म्हणून निवड

मागील निवडणुकांचा आढावा घेऊन तसेच निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त व त्यांच्या शिष्टमंडळाने ७ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत आदर्श मतदान केंद्राबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने तालुक्यातील दादपूर, कामती खुर्द, पापरी, वडदेगाव, देवडी, कोरवली, गलंदवाडी, सय्यद वरवडे, पेनूर व अंकोली या दहा गावांची आदर्श मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर हिरकणी कक्ष, फुग्यांची स्वागत कमान, मतदारांचे स्वागत, शौचालय सुविधा, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधा मतदारांना देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Latest Maharashtra News Updates : थोड्याच वेळात शिवसेनेचा नेता निवडला जाणार

SCROLL FOR NEXT