मोहोळ : पाटकुल ते टाकळी सिकंदर रस्त्या लगतच्या एका शेतात मोहोळ पोलिसांनी दोन वाहनासह 26 लाख 14 हजाराची दारू पकडली. ही घटना सोमवार ता 4 चार रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप परमेश्वर पवार वय 24 रा तांबोळे ता मोहोळ असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
या संदर्भात मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल सोमनाथ कुबेर हे तालुका पोलीस ठाण्यातील व्हीआयपी बंदोबस्त संपवून रात्री नऊ वाजता मोहोळ कडे निघाले होते.
त्यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सावंत, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ हे होते. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,
पाटकुल ते टाकळी सिकंदर रस्त्यालगत असलेल्या महावितरण कार्यालयाच्या मागील शेतात एका आयशर टेम्पो मधून दारू घेऊन एका पिकअप मध्ये ती क्रॉसिंग करण्याचे काम सुरू आहे. ही माहिती मिसाळ यांनी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना कळविली.
त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ यांनी पोलीस नाईक प्रवीण साठे व पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांना बोलावून घेतले व घटनास्थळावर माहितीची खातर जमा करण्यास गेले.त्यावेळी त्या ठिकाणी एक आयशर टेम्पो क्र एमएच 45/ 1505 व पिकअप क्र एमएच 13/3503 हे एकमेका विरुद्ध दिशेने लावलेले दिसले व तीन-चार इसम आयशर मधून पिकअप मध्ये बॉक्स टाकत असल्याचे दिसले.
त्यांच्या जवळ पोलीस जाताच ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यातील एक जण पोलिसांनी पकडला. त्याला विचारले असता त्याने त्याचे नाव प्रदीप पवार असे सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणी तपासणी केली असता 8 लाख रुपये किमतीचा एक आयशर टेम्पो 5 लाखाची एक पिकअप व्हॅन तर 7632 यात काही दारूचे बॉक्स व दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
दोन्ही वाहने व दारूचे बॉक्स व बाटल्या असा एकूण पोलिसांनी 26 लाख 14 हजार 120 रुपयाचा माल ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल सोमनाथ कुबेर यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.