Mohol Vidhansabha sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : तिरंगी लढतीने मोहोळमध्ये चुरस

Mohol Vidhansabha Election 2024 : महाविकास, महायुतीसह बंडखोर क्षीरसागरांचाही प्रचार जोरात

सकाळ वृत्तसेवा

राजकुमार शहा : खा. शरद पवार, स्व. लोकनेते बाबूराव (अण्णा) पाटील, स्व. संभाजीराव गरड, स्व. शहाजीराव पाटील यांच्या पुरोगामी व काँग्रेसच्या विचारांचा अशी ओळख असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत आहे. या निवडणुकीत आमदार यशवंत माने विरुद्ध राजू खरे आमने-सामने आहेत.

आमदार माने यांच्या प्रचारासाठी माजी आमदार राजन पाटील, लोकनेतेचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील हे प्रचारात आहेत. तर राजू खरे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपक गायकवाड, मानाजी माने, रमेश बारसकर, काँग्रेस आयचे सुरेश शिवपुजे यांच्यासह अन्य नेते मंडळी प्रचारात आहेत.

दरम्यान भूमिपुत्राचा मुद्दा उचलून धरत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. त्यांनीही प्रचार यंत्रणा राबवत गाव भेटीवर भर दिला आहे. त्यांनी वाड्या वस्त्या पिंजून काढल्या आहेत. त्यांचा फटका नेमका कोणाला बसतो हे येत्या २३ तारखेलाच समजणार आहे. आमदार माने यांच्या समोर राजू खरे यांनी आव्हान उभे केले आहे. गेल्या ३० वर्षांपासून माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचा गड कायम राखला आहे.

माजी आमदार रमेश कदम हे निवडणूक लढवतील अशी शक्यता होती. त्यांनी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी ही मागितली होती. मात्र खा पवार यांनी आमदार कदम यांची कन्या सिद्धी कदम हिला उमेदवारी दिली. मात्र ती उमेदवारी एका रात्रीपुरतीच ठरली. उमेदवारी बदलल्याने नाराज झालेले माजी आमदार कदम, सिद्धी कदम यांनी उमेदवारी मागे घेतली.

मोहोळ तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषी महाविद्यालयांची सोय नाही, त्यामुळे या तालुक्यातील मुलांना व मुलींना इतर ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागत आहे.

सीना भोगावती जोड कालवा,तसेच आष्टी व शिरापूर योजनेची अपुरी असलेली कामे, पोखरापुर तलावात पाणी सोडण्याची तयारी होऊनही पाणी न सोडल्याने शेतकऱ्यात नाराजीचा सूर दिसत आहे. या निवडणुकीत अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा हा राजन पाटील व आमदार यशवंत माने यांना त्रासदायक ठरण्याची चित्र दिसत आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात ३ हजार कोटींची कामे होऊन देखील अनेक कामे अपुरी आहेत, त्यामुळे विरोधकांनी टिकेची झोड उडवली आहे.

शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा जोर

मोहोळ शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग निहाय प्रचार केला असून आमदार माने यांना विजयी करण्याचे आव्हान केले आहे. राजू खरे यांच्या पाठीशी असलेले माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे प्रत्येक प्रचार सभेत माजी आमदार पाटील व आमदार यशवंत माने यांच्यावर टीका करत असल्याने या तिरंगी लढतीत तेवीस नोव्हेंबर रोजी कोण बाजी मारणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: विराटवर शरीरवेधी मारा करा... कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकिपर नक्की काय म्हणाला?

मतदानासाठी शेवटचे १५ मिनिटे शिल्लक! सोलापूर जिल्ह्यात ५७.०९ टक्के मतदान; दक्षिण सोलापूर, शहर मध्य व शहर उत्तर या ३ मतदारसंघात सर्वात कमी मतदान

Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान वादात ICC चं मरण, कायदेशीर कारवाईची टांगती तलवार; जाणून घ्या नेमकं कारण

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

Wardha Vidhan Sabha Voting: वर्ध्यात निलेश कराळे मास्तरांना मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT