Mohol Mrig Nakshatra  esakal
सोलापूर

Mrig Nakshatra Rain : मोहोळ तालुक्यात 'मृगा'ची दमदार हजेरी; दहा वर्षात प्रथमच पडला मृगाचा पाऊस

राजकुमार शहा

गेल्या पाच वर्षांपासून असा पाऊस प्रथमच पडल्याने शेतकरी चाऱ्यासाठी मका, उडीद, तुर, मूग, आदी पेरणीच्या धांदलीत आहे. मात्र, पाऊस नसल्याने रोजचा प्रपंच भागविणे अवघड झाले आहे.

मोहोळ : सरत्या रोहिणी नक्षत्राबरोबरच (Rohini Nakshatra) मृग नक्षत्राने (Mrig Nakshatra) मोहोळ तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. एक ते दहा जून या कालावधीत सरासरी 210 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वात जास्त पाऊस नरखेड मंडलात (Narkhed Mandal) तर, सर्वात कमी पाऊस टाकळी सिकंदर मंडलात पडला आहे. तालुक्याचे पावसाची सरासरी 550 मिलिमीटर एवढी आहे.

दरम्यान, "मृग" नक्षत्राचा असा दमदार पाऊस गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच पडल्याची माहिती शेतकऱ्यांनी (Farmers) दिली. 25 मे रोजी रोहिणी नक्षत्र निघाले. या नक्षत्रात काही ठिकाणी पाऊस पडला, तर काही ठिकाणी पडला नाही. मात्र, शेवटच्या चार दिवसात दमदार पाऊस झाला. जून महिना सुरू होताच पुन्हा मृगाने दमदार हजेरी लावली. तालुक्यातील शेततळी समतल चर भरले. तर ओढे, नाले वाहू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. हा पाऊस द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ यासह अन्य फळबागांना व वेलवर्गीय पिकांना उपयुक्त आहे.

गेल्या पाच वर्षांपासून असा पाऊस प्रथमच पडल्याने शेतकरी चाऱ्यासाठी मका, उडीद, तुर, मूग, आदी पेरणीच्या धांदलीत आहे. मात्र, पाऊस नसल्याने रोजचा प्रपंच भागविणे अवघड झाले आहे. त्यासाठी शासनाने पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्याने व धरण नक्की भरेल या आशेवर शेतकरी ऊस लागवड करण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस मोडले आहेत. बियाणे विकत घ्यावे तरी पैसा नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी "जमीन व पाणी तुमचं बाकी सर्व आमचं" ही योजना राबवावी, अन्यथा ऊस लागवडी कमी होणार आहेत.

मंडल निहाय पडलेला पाऊस मिली मीटरमध्ये पुढील प्रमाणे..

मोहोळ - 303, वाघोली - 146, नरखेड - 310, शेटफळ - 224, सावळेश्वर -108, कामती -110, टाकळी सिकंदर-100, पेनूर - 147.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT