jai-siddheshwar-swamy 
सोलापूर

खासदार डॉ. महास्वामींच्या "अटकपूर्व'वर उद्या फैसला 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्यावर 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी पहिले जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. तर गुन्हा दाखल करण्याच्या आदेशावर पुनर्विलोकन व्हावे, अशीही याचिका मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केल्याची माहिती डॉ. महास्वामींचे वकिल संतोष न्हावकर यांनी दिली. 


सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. महास्वामी यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर डॉ. महास्वामी यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी पहिले जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी (ता. 9) सुनावणी होणार आहे. तर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे दिलेल्या आदेशावरही पुनर्विलोकन व्हावे, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारी वकिलांचे म्हणणे मागविले आहे. त्यावर मुख्य जिल्हा सत्र न्यायालयात 11 मार्चला सुनावणी होणार आहे. शुक्रवारी (ता. 6) डॉ. महास्वामी यांनी सोलापूर न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या असून त्यावर पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे. 

उच्च न्यायालयात 13 अन्‌ 20 मार्चला सुनावणी 
जात पडताळणी समितीने डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यापूर्वी प्रतिवादी प्रमोद गायकवाड यांनी उच्च न्यायालयात इलेक्‍शन पिटीशन दाखल केले होते. त्यावर 20 मार्चला सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, जात पडताळणी समितीच्या आदेशाला स्थगिती द्यावी, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर 13 मार्चला सुनावणी होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT