mpsc Secondary Deputy Registrar Grade-1 Shraddha Kisan Dhananjay Urane 49 OBC first among girls  Sakal
सोलापूर

Success Story : वडील गेले; मात्र त्यांचे स्वप्न मुलीकडून पूर्ण; दुय्यम निबंधक परीक्षेत यश

वडील दुचाकीचे पंक्चर काढण्याचा व्यवसाय करायचे, मुलगी अकरावीला असताना दुर्धर आजाराने त्यांचे निधन झाले. माझी मुलगी हुशार असून ती अधिकारी व्हावी असे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न वडिलांच्या पश्चात मुलीने पूर्ण केले.

सकाळ वृत्तसेवा

अनगर : वडील दुचाकीचे पंक्चर काढण्याचा व्यवसाय करायचे, मुलगी अकरावीला असताना दुर्धर आजाराने त्यांचे निधन झाले. माझी मुलगी हुशार असून ती अधिकारी व्हावी असे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न वडिलांच्या पश्चात मुलीने पूर्ण केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम उपनिबंधक श्रेणी - १ या पदासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या मुख्य आणि एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये येथील श्रद्धा किसन(धनंजय) उरणे ही राज्यातील ओबीसीच्या ४९ जागांमधून मुलीमध्ये पहिली आली आहे.

तिचे वडील अनगर येथील लोकनेते व्यापारी गाळ्यात मोटार सायकल पंक्चर काढण्याचे दुकान चालवीत होते. तिच्या या उत्तुंग यशाने दिवंगत वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता केली आहे. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक होऊन तिने आपल्या हुशारीची चुणूक दाखवली.

त्यामुळे वडिलांना तिच्याबद्दल आत्मविश्वास होता. एकदिवस ही अधिकारी होऊन दाखविणार असे ते इतरांना नेहमी सांगत. परंतु दुर्धर आजारात त्यांचे निधन झाले. त्यावेळेस ती ११ वी मध्ये शिकत होती. वडिलांच छत्र हरपल्यामुळे शिक्षण थांबते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

अत्यंत कठीण काळात तीने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तिची आई तिच्या पाठीशी ठाम उभी राहिली. मोलाची साथ देत तिला धिर दिला. तिने प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्राथमिक शाळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणही येथील (कै.) शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पुणे येथे राहून पूर्ण केले.

श्रद्धाच्या यशाबद्दल माजी आमदार राजन पाटील, लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

दिवसाचे १० ते १२ तास अभ्यास केला. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वच स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यामध्ये मला प्रथम तलाठी दुय्यम निबंधक श्रेणी - १ आणि मंत्रालयीन उपकक्ष अधिकारी या परीक्षांत मला यश मिळाले आहे. या सर्वांची जाण ठेवून मिळालेल्या पदावर निरपेक्ष भावेतून काम करेन. माझे हे यश पाहयला आज बाबा हवे होते.

- श्रद्धा उरणे, अनगर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT