सोनाली मनोहर भाजीभाकरे sakal
सोलापूर

सहाव्या प्रयत्नात MPSCत मिळाले पहिले यश ; सोनाली मनोहर भाजीभाकरे

सहाव्या प्रयत्नात एमपीएससीतुन उत्तीर्ण झालेल्या माढ्याच्या भाजीभाकरे

सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक : शंभर प्रकारचे अपयश पचवल्यानंतर यशाची गोडी चाखायला मिळते. मात्र त्यासाठी शंभर वेळा पडूनही पुन्हा उभं राहण्याची तयारी, जिद्द मनात असावी लागते. यश मिळवण्यासाठी मेहनत, दृढता, निश्चय पक्के असावे लागतात. त्यानंतर यशाची चव चाखायला मिळते हे आपण कित्येकदा ऐकले आहे. याचीच प्रचिती कुर्ड (ता.माढा) येथील सोनाली मनोहर भाजीभाकरे यांच्या यशातुन दिसुन येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग पाच वर्षे अपयश येऊनही हार न मानता 'मी अधिकारी होणारच' या ध्येयाने प्रेरित होऊन सहाव्या प्रयत्नात नायब तहसीलदारपदाला गवसणी घातली. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे सांगतात की, आई गृहिणी तर वडिल शेतकरी होते. शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असायचा. ग्रामीण भागात चालत आलेल्या रूढी परंपरा आमच्या घरात पाळल्या जायच्या. त्यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी घरात पोषक असे वातावरण नव्हते. अशा परिस्थितीत माझे शिक्षण सुरू झाले होते. प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाल्यानंतर आंतरभारती विद्यालयातून माध्यमिक शिक्षण झाले. सातवीत असतानाच कुर्डुवाडी येथे प्रांताधिकारी म्हणून नयना मुंडे कार्यरत होत्या. त्यांच्या कामाबद्दल व स्पर्धा परीक्षेबद्दल शिक्षकांनी वर्गात माहिती दिली.

त्यामुळे आपणही या क्षेत्रात प्रयत्न करावा असे मनोमन इच्छा निर्माण झाली. परंतु घरातुन पाहिजे तसा शिक्षणासाठी प्रतिसाद नव्हता. त्यातच या कालावधीत घरात माझ्या लग्नासाठी चर्चा सुरू झाली. लग्नाची काही स्थळे आली, बैठका देखील झाल्या. परंतु नशीबाने त्यावेळी लग्न झाले नाही. त्यात शिक्षणासाठी असलेली माझी तळमळ पाहून दहावीपर्यंत शिक्षण देण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला.‌ जिद्द व चिकाटीने अभ्यास करत दहावीच्या परीक्षेमध्ये शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यामुळे मुलगी असल्याने, माझ्या शिक्षणासाठी कुटुंबात नकारात्मक असलेले वातावरण थोडेसे सकारात्मक झाले. त्यात शिक्षकांनी गावातील सरपंचांनी माझ्या गुणवत्तेच्या बाबतीत कुटुंबियांना कल्पना देत पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे आव्हान केले.

दहावीत चांगले गुण घेऊनही पुढील शिक्षणासाठी बाहेर कुठे न पाठवता कुर्डुवाडीत प्रवेश घेऊन देण्यात आला. त्यात अधुनमधून लग्नाची चर्चा होत असल्याने, शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहाणे आवश्यक होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत स्वतः ला सिद्ध करणे गरजेचे होते. कारण ग्रामीण भागातील महिलांची अवस्था मी जवळून पाहिली होती. घर अन् मुलं इतकंच मर्यादित त्यांच आयुष्य होते. हे समाजात व कुटुंबात मी पाहिले होते. त्यामुळे अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी प्रयत्नशील होते.

बारावीतही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर, स्पर्धा परीक्षा करण्याची इच्छा असुनही, त्यामध्ये यश नाही मिळाले तर आपल्याला देखील असेच आयुष्य जगायला लागेल यासाठी बारावीनंतर मला स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करायची इच्छा असुनही, 'प्लँन बी' म्हणून हातात एखादी चांगली पदवी असावी या उद्देशाने इंजिनिअरिंग, मेडिकलचे शिक्षण घ्यावे असा संकल्प केला होता. परंतु घरातुन यासाठी विरोध होता. वडिलांनी मुक्त विद्यापीठातुन पदवीचे शिक्षण घेत, डिएड करण्याचा सल्ला दिला. परंतु बार्शीतील डिएडला प्रवेश मिळाला नाही.

अशातच एक शैक्षणिक वर्ष वाया गेले. याकाळात आमदार बबनराव शिंदे यांचे कुर्डूवाडीत बीएससी चे महाविद्यालय सुरू झाले. तेथून बीएससी शिक्षण पूर्ण केले. नंतर ते महाविद्यालय बंद झाले‌. जर ते महाविद्यालय सुरू झाले नसते तर माझे शिक्षण तिथेच बंद झाले असते. कदाचित माझ्या शिक्षणासाठीच ते महाविद्यालय सुरू झाले होते असे कधीकधी वाटते.

शिक्षणाच्या इथपर्यंतच्या प्रवासात अनेक टर्निंग पॉईंट मिळत गेले होते‌. त्यात माझी शिक्षणासाठी असलेली तळमळ पाहून कुटुंबातील वातावरण देखील पोषक होत गेले‌. पुढे एमबीए करण्याचा सल्ला अनेकांकडून मिळाला त्यानुसार पुणे येथे प्रवेश मिळेल अशी अपेक्षा असताना. मुलीने घराबाहेर राहु नये यासाठी कुटुंबियांनी सोलापूराच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. व दररोज कुर्डुवाडीवरून ये-जा करून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. इथेही चांगले गुण मिळाल्याने, स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुणे गाठले.

युनिक अकॅडमी मध्ये अभ्यास सुरू केला. स्वतः कमविते झाले तर घरचे लग्नाचा विषय काढणार नाहीत. या उद्देशाने युनिक अकॅडमी मध्ये नोकरी करत अभ्यास सुरू केला. जबरदस्त इच्छाशक्ती असल्याने, पहिल्या प्रयत्नात यश येईल असे वाटत होते‌. परंतु घडले वेगळेच पहिले यश संपादन करण्यासाठी जवळपास सहावेळा मुख्य परीक्षा दिल्या व तीन वेळा मुलाखत दिली. सातत्याने अपयश येत असताना, संयम बाळगून, प्रयत्न करत राहिले. त्यामुळेच यशाला देखील हार मानावी लागली. अन् सहाव्या प्रयत्नात नायब तहसीलदारपदी निवड झाली.

ज्यांचा प्रथम माझ्या शिक्षणासाठी विरोध होता. त्यांचाच स्पर्धा परीक्षेच्या या कठिण काळात मोठा आधार व प्रतिसाद मिळाला. कुटुंबियांच्या सहकार्यामुळे मी यशस्वी होऊ शकले. तब्बल सात वर्षांनंतर घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु अवघ्या काही महिन्यांतच ज्यांच्या मदतीने मी हे स्वप्न साकार केले ते सर्वजण मला सोडून गेले.

त्यामध्ये माझे आत्येमामा, मावशी, काका, आई-वडिल, मावसभाऊ, मोठा भाऊ असे जवळपास दहा जणांचे कोरोनाने निधन झाले. सध्या परिविक्षाधीन अधिकारी म्हणून इंदापूर (जिल्हा पुणे) येथे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना 'प्लँन बी' म्हणून या क्षेत्राकडे पाहावे. स्पर्धा परीक्षाच म्हणजे सर्वस्व नसुन, इतर क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT