msedcl provide smart electric meter electricity devendra fadnavis esakal
सोलापूर

Solapur News : जिल्ह्यातील सात लाख वीजग्राहकांना ‘महावितरण’कडून स्मार्ट मीटर

लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड वीजमीटर मोफत बसविण्याचे नियोजन ‘महावितरण’कडून पूर्णत्वास गेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड वीजमीटर मोफत बसविण्याचे नियोजन ‘महावितरण’कडून पूर्णत्वास गेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्रीफेजच्या एकूण ६८ लाख ३९ हजार ७५२ वीजग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत.

त्यात सोलापूर जिल्ह्यातील सात लाख १६ हजार ६४६ ग्राहकांचा समावेश आहे. यासोबतच ‘महावितरण’च्या वीज वितरणाचा हिशेब अचूक ठेवण्यासाठी जिल्ह्यात २२ हजार ९३३ वितरण रोहित्रे, वीजवाहिन्यांना स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत.

विजेच्या व नवीन वीजजोडण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी तसेच वितरण यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी ‘सुधारित वितरण क्षेत्र’ योजना राबविण्यात येणार आहे. योजनेतून लघुदाब वीजग्राहकांकडे प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचे व विजेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा ग्राहकांना अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येत आहेत.

मार्च महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रात मीटर बसविण्याचे काम सुरू होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपरिक वीजमीटरच्या प्रणालीत ६८ लाख ४० हजार ग्राहकांकडे जावून दरमहा मीटरचे फोटो रीडिंग घेणे, त्यानुसार वीजबिल तयार करून वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो.

घराला कुलूप असल्याने रीडिंग न घेता येणे, चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे, मीटर नादुरुस्त होणे तसेच वीजबिलांचा भरणा न होणे, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे, अशा समस्या उद्‌भवतात. त्यामुळे स्मार्ट मीटररिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विजेवरील खर्च नियंत्रणात राहील. पाहिजे तेवढाच वीजवापर करता येईल आणि बिलिंगच्या तक्रारी संपुष्टात येईल’ अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी दिली.

स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये

  • वीजग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत देण्यात येईल. विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल

  • वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल

  • विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचत करता येईल. मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होईल

  • रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार आर्थिक नियोजन करणे शक्य होईल

  • रिचार्जची रक्कम सायंकाळी सहा ते सकाळी १० वाजेपर्यंत संपली, तरी वीजपुरवठा सुरू राहील. मात्र ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत रिचार्ज करणे आवश्यक असेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT