Muharram Festival  esakal
सोलापूर

Muharram Festival : हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्याची परंपरा आदर्श घेण्यासारखी; मंगळवेढ्यात 68 ठिकाणी पंजाची स्थापना

मंगळवेढा तालुक्यामध्ये 68 ठिकाणी पंजाची स्थापना करण्यात आली.

हुकूम मुलाणी ​

शाहू महाराजांनी सर्व बहुजनांना सोबत घेऊन राज्यकारभार केला, त्यांचा आदर्श समोर कोल्हापुरात असे साजरे होतात.

मंगळवेढा : नवरात्र महोत्सव (Navratri Festival) आणि गैबीपीर उरूस हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim Community) धार्मिक ऐक्यातून साजरा होत असून तीच ऐक्याची परंपरा मोहरमच्या सणात दिसून येते. हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्याची परंपरा इतरांसाठी आदर्श घेण्यासारखी आहे.

तालुक्यामध्ये 68 ठिकाणी पंजाची स्थापना करण्यात आली. तर, 26 ठिकाणी डोले तर 14 ठिकाणी घोडे बसवले. तालुक्यामध्ये साजऱ्या होणाऱ्या नवरात्र महोत्सवाचा अध्यक्ष हा मुस्लिम समाजाचा आणि गैबीपीर उरूस कमिटीचा अध्यक्ष हिंदू समाजाचा (Hindu Community), या एकोप्यातून हे धार्मिक सण तालुक्यामध्ये उत्साहामध्ये साजरे केले जातात.

देशभरात सध्या जातीय वातावरण गढूळ होत जात असताना मंगळवेढेकरांनी घालून दिलेला आदर्श प्रेरणादायी असताना तीच परंपरा मोहरमच्या उत्सवात देखील दिसून येते. ग्रामीण भागामध्ये सलग 10 दिवस या उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवले. हे उपक्रम राबवण्यामध्ये हिंदू बांधवांचा पुढाकार मोठ्या प्रमाणात असतो, तर या निमित्ताने ताबूतची स्थापना, सवारीच्या मिरवणुका देखील निघाल्या. या सवारीचे पंजे हे हिंदू बांधवांकडून घेतले जातात.

तालुक्यातील हुलजंती, जित्ती, नंदूर, नंदेश्वर, सलगर बु, खडकी, मरवडे ,भाळवणी, रड्डे, लोणार, निंबोणी, खोमनाळ, आंधळगाव, सिद्धापूर, अरळी, लवंगी, शिवनगी, तळसंगी, बावची, तळसंगी, पडोळकरवाडी, खूपसंगी या गावात पंजे आणि डोलेची स्थापना करण्यात येते, तर ठिकाणी धार्मिक कार्यक्रमात साठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला. मंगळवेढ्यात मात्र उत्सवामध्ये पोलीस बंदोबस्तापेक्षा जनतेचा बंदोबस्त अधिक सक्षम असतो. असे उत्सव अधिक चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे इथल्या धार्मिक उत्सवाची परंपरा संपूर्ण देशाने आदर्श घेण्यासारखी आहे.

शाहू महाराजांनी सर्व बहुजनांना सोबत घेऊन राज्यकारभार केला, त्यांचा आदर्श समोर कोल्हापुरात असे साजरे होतात. मंगळवेढ्यामध्ये हिंदू बांधवांच्या पुढाकारातून साजरी होणारे सण सध्याच्या परिस्थितीत देशाला आदर्श घेण्यासारखे आहेत. उलट अशा एकोप्यामुळे पोलिसांवरील देखील ताण कमी असतो.

-महेश ढवन, पोलीस निरीक्षक मंगळवेढा

जातीय तणाव निर्माण करणाऱ्या लोकांसाठी मंगळवेढा एक आदर्श आहे, तिथे सर्वच उत्सव एकमेकांच्या सहकार्यातून चांगल्या पद्धतीने साजरे होतात. उत्सवात नागरिकांचा सहभाग वाढल्यामुळे तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळते.

-प्रशांत गायकवाड अध्यक्ष नवमहाराष्ट्र तरुण मंडळ

उरुस आणि मोहरम सणात हिंदू बांधवांचा अधिक पुढाकार असतो, यातून हिंदू-मुस्लीम सामाजिक सलोखा जपला जातो. माणुसकी एक जात आहे. माणुसकी त्याचा धर्म समजून सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहतात याचा मनापासून आनंद आहे.

-लतीफ तांबोळी, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT