Mazi Ladki Bahin Yojana Esakal
सोलापूर

Ladki Bahin Yojana: 'त्या' महिलांना मिळणार नाहीत 'लाडकी बहीण'चे पैसे; लाभ मिळवण्यासाठी घ्यावी लागणार बँकेत धाव

Ladki Bahin Yojana Bank Aadhaar Link: ज्यांनी आतापर्यंत योजनेसाठी अर्ज केलेला नाही, अशा पात्र महिलांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आशुतोष मसगौंडे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील साडेदहा लाख महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील अंदाजे तीन ते साडेतीन लाख महिलांना अद्याप काहीच लाभ मिळालेला नाही तर उर्वरित महिलांना आता सप्टेंबरचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. दोन्ही प्रकारातील लाभार्थी महिलांना २९ सप्टेंबरला लाभ मिळेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसह राज्य सरकारच्या विविध योजनांचे सुमारे ४० हजार लाभार्थींना आणून शहरातील होम मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत वचनपूर्ती सोहळाहोणार आहे.

आतापर्यंत चारवेळा याकार्यक्रमाचे नियोजन झाले, दोनदा कार्यक्रमाची तारीखही निश्चित झाली, मात्र अद्याप तो सोहळा झालेला नाही.

प्रशासनाकडेही हा कार्यक्रम होणार यासंदर्भात ठोस माहिती नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता कार्यक्रम राहू द्या दरमहा एका फिक्स तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी सर्व लाभार्थीं करीत आहेत.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत योजनेसाठी अर्ज केलेला नाही, अशा पात्र महिलांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सुमारे साडेदहा लाख महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यातील एक लाख ३६ हजार महिलांच्या बँक खात्याला आधारलिंक नाही, त्यांनी आधारलिंक केल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही. आता पुढील लाभाची रक्कम २९ सप्टेंबरला वितरीत होणार आहे.
प्रसाद मिरकाले, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

'त्या' महिलांना पैसे नाहीत

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार महिलांच्या बँक खात्याला आधारलिंक नाही. त्यांनी आता बँक खात्याशी आधारलिंक केल्याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

२९ सप्टेंबरपूर्वी संबंधित बँकेत जाऊन त्या अर्जदार महिलांना खात्याला आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे. त्यांची यादी राज्यस्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. ज्यांनी योजनेच्या सुरवातीला आज केला पण अद्याप लाभ मिळाला नाही, अशा त्या महिला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: राज्यात 38 जागांवर मुस्लिम लोकसंख्या जास्त; मतदारसंघात भाजपचीच सरशी, विक्रमी जागा जिंकल्या

IND vs AUS 1st Test : 8 Runs, 3 Wickets! यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर भारताचा डाव गडगडला; ऋषभ पंत, ध्रुव जुरेल ठरले अपयशी

Gas Tanker Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

Nashik Assembly Election 2024 Result : नाशिकमध्ये महिला आमदारांची पुनरावृत्ती; जिल्ह्यात 196 उमेदवारांपैकी 20 महिला

Assembly Elections 2024 : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

SCROLL FOR NEXT