SMC Agitation 
सोलापूर

उपमहापौर काळेंविरोधात एकवटले महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी ! काळेंचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी 

अमोल व्यवहारे

सोलापूर : महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरोधात गुरुवारी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले. महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिकेचे उपायुक्‍त डॉ. धनराज पांडे यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण करून खंडणी मागितली. या प्रकरणी काळे यांच्याविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून, महापालिका कामगार कृती संघटनेच्या वतीने गुरुवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. 

सकाळी महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या पायऱ्यांवर कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, तिरुपती परकीपंडला हेदेखील उपस्थित होते. 

या वेळी बोलताना जानराव यांनी उपमहापौर काळे यांनी केलेल्या अर्वाच्य शिवीगाळप्रकरणी कामगारांनी काम बंद आंदोलन केले असल्याचे सांगितले. काळे यांनी पांडे यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असून, काळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली तर पोलिसांनी ती दाखल करून घेऊ नये; तसेच काळे यांना पोलिसांनी त्वरित शोधून या गुन्ह्यात अटक करावी. काळे यांचे सभासदत्व रद्द करावे यासाठी प्रयत्न करावेत. काळे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचेही जानराव यांनी सांगितले. 

या वेळी पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने कामगारांच्या वतीने महापालिकेच्या आवारातच जोरदार घोषणाबाजी करून काळे यांचा निषेध व्यक्‍त करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलिसांच्या बंदोबस्तात पोलिस वाहनांमधून जाऊन जिल्हाधिकारी शंभरकर यांना निवेदन दिले. या वेळी संघटनेचे प्रदीप जोशी, चांगदेव सोनवणे, शंतनू गायकवाड, अशोक इंदापुरे, विवेक लिंगराज, माऊली पवार, संजय डोंगरे, तेजस्विनी कासार, बापू मंडपे, उमेश गायकवाड, बापू सदाफुले यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच प्रकरणावरून राजपत्रित अधिकारी-कर्मचारी संघटना तसेच शहर कामगार संघटना कृती समितीच्या वतीनेही जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उपमहापौर काळे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 

"या वादाचा लोकमंगल फाउंडेशन विवाह सोहळ्याशी तिळमात्र संबंध नाही' 
उपमहापौर राजेश काळे आणि महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्यामधील वादासंबंधी लोकमत फाउंडेशनने जाहीर खुलासा केला आहे. लोकमंगल फाऊंडेशनकडून दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा हरीभाई देवकरणच्या प्रांगणात होत असतो. पण यंदाच्या वर्षी विवाह संख्या कमी असल्याने व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये व प्रशासनास सहकार्य व्हावे या उद्देशाने अत्यंत साध्या पद्धतीने सामाजिक अंतराचे नियम पाळत विवाह सोहळा मेहता प्रशाला, जुळे सोलापूर येथे पार पडला.

या विवाह सोहळ्यासाठी सार्वजनिक मोबाईल शौचालयासह साफसफाईसाठी उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे व झोन अधिकारी नीलकंठ मठपती यांना शिवीगाळ केल्यामुळे काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे लोकमंगल फाउंडेशनची सामाजिक चळवळ विनाकारण टीकेची धनी होत असल्याचे दिसून येते. सामुदायिक विवाह सोहळ्यास सोलापूर महापालिका व पोलिस प्रशासनासह इतर प्रशासकीय यंत्रणा या लोकमंगलला नेहमीच नियमाप्रमाणे सहकार्य व मदत करत असतात. प्रशासनाच्या सहकार्यानेच इतका दिव्य विवाह सोहळा आम्ही अनेक वर्षांपासून विनातक्रार कुठलीही अनुचित प्रकार न घडता पार पाडत आहोत. महापालिका व पोलिस प्रशासनाचे आमच्या उपक्रमातील यशात नेहमीच मोलाचे योगदान असते.

गेली अनेक दिवसांपासून उपमहापौर राजेश काळे व महापालिका यांच्यातील प्रशासकीय कामाबाबत सतत वादग्रस्त बातम्या दैनिकातून येत असतात. यावरून जो काही वाद राजेश काळे व उपायुक्त धनराज पांडे यांच्यात आहे, त्या वादाचा लोकमंगल फाउंडेशन विवाह सोहळ्याचा तिळमात्र संबंध नाही. सार्वजनिक कामाबाबत फाउंडेशनने महापालिकेला रीतसर पत्रव्यवहार करून सहकार्याची विनंती केली होती. त्यामुळे महापालिकेने शासकीय नियमानुसार सहकार्य व मदत केली आहे. आमची मनपाच्या विरोधात कुठलीही तक्रार नव्हती व नाही. तसेच उपमहापौर राजेश काळे यांना विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी नियम डावलून अथवा नियमबाह्य बेकायदेशीर काम करा म्हणून फाउंडेशनच्या वतीने कोणीही काळे यांना तक्रार केली नव्हती. उपायुक्त धनराज पांडे यांच्या तक्रारीवरून उपमहापौर काळे व पांडे यांचा वाद हा मनपातील आरोग्य विभाग व इतर प्रशासकीय कामातील अनियमितता व बेकायदेशीर कामाबाबत मनपातील संघर्ष आहे असे दिसून येते. या सर्व प्रकरणात विवाह सोहळ्याचा काहीही संबध नाही. विनाकारण लोकमंगल फाउंडेशनची समाजात बदनामी होऊ नये यासाठी हा जाहीर खुलासा करीत असल्याचे फाउंडेशनच्या व्यवस्थापकांनी प्रसिद्धिपत्राद्वारे कळविले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT