Chimmateshwar
Chimmateshwar 
सोलापूर

नागपंचमीस नाभिक समाज दाढी-कटिंगची कामे करत नाहीत ! कारण काय? वाचा सविस्तर... 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : शहरातीलच नव्हे तर देशभर पसरलेले नाभिक समाजबांधव नाभिक पुराण कथेनुसार दरवर्षी नागपंचमी दिवशी दाढी-कटिंग आदी आपली वंशपरंपरागत कामे करत नाहीत. सोलापूर शहरात पारंपरिक पद्धतीने हा रिवाज पाळला जात आहे. मात्र नव्या पिढीला नागपंचमी दिवशी काम का बंद ठेवावा लागतो, याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांपूर्वी नाभिक समाजाने बैठक घेऊन नाभिक पुराणाबाबत नव्या पिढीला माहिती दिली. तेव्हापासून सर्व सलून दुकानदार नागपंचमी दिवशी दुकाने बंद ठेवतात. या दिवशी नाभिक म्हणजेच समाजाचे कुलदैवत चिम्मटेश्‍वरांचा रथोत्सव काढला जातो. मात्र या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. 

सोलापूर तेलुगु नाभिक ज्ञाती संस्थेचे विश्‍वस्त-अध्यक्ष आनंद सिंगराल यांनी नाभिक समाजाची उत्पत्ती व नागपंचमीचे महत्त्व याविषयी माहिती दिली. नाभिक पुराण कथेनुसार नाभिकाची उत्पत्ती शंकराच्या नाभीतून झाली, अशी कथा आहे. पृथ्वीवर जलप्रलय झाला तेव्हा भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून तो थांबवला. पृथ्वीवर समुद्र, पर्वत व नद्यांची निर्मिती केली; तर आकाशात चंद्र, सूर्य, तारे आणि नक्षत्रांची स्थापना केली. शंकराच्या कृपेने विष्णूच्या नाभीतून ब्राह्मणाची उत्पत्ती झाली. तो चतुर्मुख होता. त्या ब्राह्मणाला शंकराने सृष्टीची निर्मिती करण्यास सांगितले. तेव्हा विष्णूने शंकराला सांगितले, की ब्राह्मणाचे मुंजबंधन झाल्याशिवाय त्यास ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही. मुंजसाठी जानवे व शिखाची गरज होती. शिखाचे काम कोणी करावे, हा प्रश्न निर्माण झाला. शिखा प्राप्त होण्यासाठी नाभिकाची निर्मिती आवश्‍यक होती. तेव्हा भगवान शंकराने आपल्या कंठातील शेषाला स्वत:च्या नाभीकमलातून जन्म घेण्यास सांगितले. तेव्हा शेषाने भगवान शंकराला विचारले, की "जन्मानंतर मला कशाची प्राप्ती होईल?' शंकर उत्तरले, "तुला सर्व कामांत मोठा मान प्राप्त होईल. तुझ्याशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही. सर्वांचा आवडता होशील व श्रावण महिन्यातील नागपंचमीस तुझे पूजन केले जाईल. स्त्रियांचा तू भाऊ होशील. तुझ्या वंशात उत्पन्न झालेल्या सर्वांना मान देतील.' ही सर्व कथा ऐकून शेषाने शंकराच्या नाभीतून मनुष्यरूपाने जन्म घेतला. शंकराच्या नाभीतून जन्म घेतल्यामुळे तो शेषनाग झाला. नाभिक म्हणजेच शेषनाग आहे. शेषनागाचा वंशज आहे. पूर्वी केस कापण्यासाठी चिम्मट वापरले जात असल्याने पुढे नाभिकाचे चिम्मटेश्‍वर हे नाव रूढ झाले. तेव्हापासून नागपंचमी दिवशी नाभिक समाजबांधव आपले व्यवसाय नागपंचमीस बंद ठेवतात. 

या प्रथेबाबात तेलुगु नाभिक ज्ञाती संस्थेचे विश्‍वस्त-सचिव अभयकुमार कांती म्हणाले, ग्रामीण भागातील नागदेवतेच्या मंदिरात नाभिक समाजाच्या पुजाऱ्याकडून नागपंचमी दिवशी पूजा केली जाते. शहरातून चिम्मटेश्‍वर भगवानचा रथोत्सव काढण्यात येतो. मात्र या वर्षी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रथोत्सव रद्द करण्यात आला असून, समाजबांधवांनी चिम्मटेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी येऊ नये. मंदिरात पूजाविधी झाल्यानंतर सोशल मीडियामार्फत छायाचित्रे व व्हिडीओ पाठवले जातील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumabi Traffic Ambani Wedding : मुंबईत अंबानींचा हायप्रोफाईल लग्नसोहळा, वाहतुकीत महत्वाचे बदल; 'या' मार्गावर जाणं टाळा

T20 World Cup: 'तोही रडत होता अन् मीही, तेव्हा...', रोहितबरोबरच्या 'त्या' खास क्षणाबद्दल विराट झाला व्यक्त

Bajaj Freedom 125: बजाजने लॉन्च केली जगातील पहिली CNG बाईक! बजाज फ्रीडम 125 भारतात लॉन्च, किती आहे किंमत?

Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

Mahesh Jethmalani: अदानीला संपवण्यासाठी चीन प्रयत्न करतोय का? महेश जेठमलानींचे धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT