मंगळवेढा : कौटुंबिक व्यापातून महिलांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही मात्र सणवाराच्या निमित्ताने त्यांना एकत्र येऊन व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळत असल्याचे प्रतिपादन अंजली अवताडे यांनी व्यक्त केले.
नागपंचमी सणाच्या निमित्ताने जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या पुढाकारातून हिवरगाव येथे महिलांसाठी एक दिवशीय विविध कार्यक्रम व यात्रेचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमात बक्षीस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर सुमन खांडेकर, माधुरी खांडेकर,कमल खांडेकर, अनिता वाघमारे ,अंबिका कर्वे,वैशाली वाघमोडे,अनुसया नागणे,रेखा खांडेकर,लक्ष्मी खांडेकर, उज्वला चवरे,यांच्यासह या परिसरातील 500 हून अधिक महिलांची उपस्थिती होती.
नागपंचमी सणांच्या निमित्ताने हिवरगाव येथे पहिल्यांदाच दीड एकर जागेत एक दिवशीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महिलांसाठी संगीत खुर्ची, टिकली, लंगडी, पारंपारिक झोके, फुगडी व इतर यात्रेत असणारी खेळणे उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी बोलताना अंजली अवताडे म्हणाल्या की, महिला अनेक कार्यक्रमात पुढाकार घेण्याची पात्रता असते परंतु कौटूबिक व्यापामुळे त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही अशा कार्यक्रमातून व्यक्त होण्याची संधी मिळते आणि महिला एकमेकीत असणारे दुःख एकमेकीसमोर व्यक्त करून त्या कमी करण्यासाठी मदत करू शकतात.
त्यामुळे गावोगावी अशा कार्यक्रमाची महिलांसाठी आयोजन करण्याची गरज असल्याची प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी घेण्यात आलेल्या संगीत खुर्चीमध्ये साक्षी नागणे, टिकली मध्ये शिवानी बागल, लंगडीमध्ये मंदाताई लोकरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या एक दिवशीय यात्रेमध्ये खेळणी व विविध स्टॉल व सुविधा पाहून महिलांनी समाधान व्यक्त केले. उपस्थित महिलांना जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या पुढाकारातून साडीचे भेट नागपंचमीच्या निमित्ताने देण्यात आली. जवळपास दिवसभर या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे महिला पूर्णपणे कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त होत या कार्यक्रमात सहभागी होवून आनंद लुटला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.