नागपंचमी विशेष : पाच लाख उंदरांवर नियंत्रण ठेवणारा निसर्गरक्षक ! Canva
सोलापूर

नागपंचमी विशेष : पाच लाख उंदरांवर नियंत्रण ठेवणारा निसर्गरक्षक !

नागपंचमी विशेष : पाच लाख उंदरांवर नियंत्रण ठेवणारा निसर्गरक्षक !

प्रकाश सनपूरकर

सापांपासून मानवास होणारे फायदे ओळखून सापांबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी नागपंचमी हा सण साजरा होऊ लागला.

सोलापूर : नागपंचमीच्या दिवशी नागाची (Snake) पूजा केली जाते. आपल्या पूर्वजांनी सापांचे महत्त्व ओळखले होते. सापांपासून मानवास होणारे फायदे ओळखून सापांबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी नागपंचमी (Nagpanchami) हा सण साजरा होऊ लागला. सापांबद्दल समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा (Superstition) व गैरसमजुतींमुळे साप आपला शत्रू असल्याचा गैरसमज पसरला. पण सत्य परिस्थिती या उलट असून मानवाने ती स्वीकारायला हवी. साप हा जैवसाखळीत (Biochain) सर्वाधिक संख्येने वाढणाऱ्या उंदरांचा (Rat) भक्ष्यक आहे. त्याचे हे जैवसाखळीतील महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. त्यामुळे साप हा निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.

मानवाने तंत्रज्ञानात भरपूर प्रगती केली असली तरी उंदरांची संख्या घटवण्याचा सापाच्या माध्यमातून निसर्गाचा मार्ग माणसाच्या मार्गापेक्षा अधिक परिणामकारक आहे. उंदीर हे कोणत्याही इतर मार्गाने नियंत्रित केले जाऊ शकत नाहीत. उंदीर खाणारे बरेच प्राणी आहेत, पण उंदरांच्या बिळात जाऊन त्यांना खाणारा प्राणी म्हणजे फक्त सापच. काही प्रामाणिक सर्पमित्रांमुळे सापांचे संरक्षण व त्यांच्या जीविताबद्दल जनजागृती वाढली आहे.

साप आयुष्यभरात सव्वापाच लाख उंदीर खातो

एक उंदराची जोडी वर्षाला 850 पिल्लांना जन्म देते. एका सापाने आठवड्याला दोन जरी उंदीर खाल्ले तरी एका वर्षाला (850 गुणिले 52 आठवडे) = 44,200 सरासरी उंदरांवर नियंत्रण साप ठेवतो. एक साप सरासरी 12 वर्षे जगल्यास 44,200 गुणिले 12 = 5,30,000 सरासरी उंदरांवर नियंत्रण ठेवतो. म्हणजेच एक साप त्याच्या आयुष्यभरात सव्वापाच लाख उंदरांवर नियंत्रण ठेवतो. शेतातील 30 ते 35 टक्के पिकांचे नुकसान उंदीर करतात. उंदीर किती घातक आहेत आणि साप किती फायदेशीर आहेत, हे लक्षात येईल.

सापाच्या प्रजाती...

  • एकूण 335 प्रजाती

  • बिनविषारी प्रजाती 220

  • निमविषारी प्रजाती 45

  • विषारी प्रजाती 70

  • महाराष्ट्रातील विषारी प्रजाती 4 (नाग, मण्यार, घोणस, फुरसे)

सापाचे नैसर्गिक जीवन पाहता तो उंदराच्या संख्येचे संतुलन ठेवणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यासाठी कोणत्याही सापाला न मारता त्याच्या नैसर्गिक अधिवासासाठी आवश्‍यक प्रयत्न व्हायला हवेत.

- राहुल शिंदे, सर्प अभ्यासक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयी उमेदवाराचे औक्षण करताना रसायनयुक्त गुलालामुळे उडाला भडका; सहा ते सात कार्यकर्ते भाजले, नेमकं काय घडलं?

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपालांची घेणार भेट

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध ए आर रहमानने जारी केली कायदेशीर नोटीस ; "या अफवेमुळे माझ्या कुटूंबाला त्रास..."

SCROLL FOR NEXT