हातमाग विणकरांना मिळताहेत प्रशिक्षणातून स्वावलंबाचे धडे ! Canva
सोलापूर

हातमाग विणकरांना मिळताहेत प्रशिक्षणातून स्वावलंबाचे धडे !

हातमाग विणकरांना मिळताहेत प्रशिक्षणातून स्वावलंबाचे धडे !

राजशेखर चौधरी

हातमाग व्यवसायावर अर्थार्जन असलेल्या कुटुंबीयांवर आर्थिक अडचणीची वेळ आली आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : राष्ट्रीय हातमाग दिन (National Handloom Day) संपूर्ण देशात 7 ऑगस्ट रोजी साजरा होत असतो. शेतीनंतर वस्त्रोद्योग (Textile Industry) देशाच्या अर्थव्यवस्थेत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, देशातील नवनवीन तंत्रज्ञानामुळे हातमाग व्यवसाय लोप पावत आहे. त्यामुळे या व्यवसायावर अर्थार्जन असलेल्या कुटुंबीयांवर आर्थिक अडचणीची वेळ आली आहे. यासाठी हातमाग व्यवसायाला संजीवनी मिळावी व हातमागावर तयार होणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी तसेच या वस्तूंची मागणी वाढावी, या उद्देशाने अक्कलकोट (Akkalkot, Solapur) तालुक्‍यातील वागदरी येथे हातमाग विणकरांना (Handloom weaver) प्रशिक्षण देऊन स्वावलंबी जीवन जगण्याचे धडे देण्यात येत आहेत. सध्या या प्रशिक्षणाचे दुसरे सत्र सुरू आहे.

7 ऑगस्ट हा दिवस हातमाग दिवस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली जाहीर केला. तेव्हापासून शासनाने विणकरांना प्रशिक्षण देऊन या व्यवसायासाठी लागणारे माग व इतर साहित्य, पत्राशेडसाठी आर्थिक मदत सुरू केली. या योजनेचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. अनेक कुटुंबं आता स्वावलंबी जीवन जगत आहेत. शेतीनंतर वस्त्रोद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत दुसऱ्या स्थानावर आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जवळजवळ 37 टक्के वाटा कापड उद्योगाचा आहे. एकेकाळी देशात हातमागावर विणलेले कापड सर्वत्र प्रसिद्ध होते. या कपड्याला जागतिक बाजारपेठेत खूपच मागणी असायची. जसा काळ बदलत गेला, तशा नागरिकांच्या आवडीनिवडी बदलल्या. त्याप्रमाणे हातमागावर नावीन्यपूर्ण डिझाईनसह कपड्याला बाजारपेठ मिळवून देण्यात आली. सध्या या व्यवसायावर उदरनिर्वाह करणारी कुटुंबे संकटात आली आहेत. हातमाग काम करणाऱ्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक हातमाग विणकराला पेन्शन लागू करावी, हातमाग व्यवसाय करू पाहणाऱ्या विणकरांना 4 टक्‍क्‍यांप्रमाणे कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वागदरी येथील विणकर बांधव करीत आहेत.

हातमागाच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने वस्त्रोद्योग मंत्रालय व विणकर सेवा केंद्र यांच्या वतीने हातमाग विणकरांना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला हळूहळू यशदेखील येत आहे. वागदरी येथे आता दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

- पूजा सतीश पुरंत, वागदरी

वागदरी येथे 350 विणकर

वागदरी येथे हातमाग व्यवसायाची वृद्धी व्हावी यासाठी तांत्रिक प्रशिक्षण देणे सुरू आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण 11 फेब्रुवारी 2020 ते 30 मार्च 2020 या काळात 20 जणांना देण्यात आली आहे. आता 31 जुलै 2020 ते 16 सप्टेंबर 2020 या काळासाठी दुसऱ्या टप्प्याचे आणखी 20 जणांसाठी प्रशिक्षण देणे सध्या सुरू आहे. या वेळी बेडशीट, आसन पट्टी किंवा त्यातील अनेक बारकावे शिकविणे सुरू आहे. हे प्रशिक्षण मराठवाडा खादी ग्रामोद्योग केंद्र यांच्यामार्फत सुरू आहे. वागदरी येथे 350 विणकर महिला व पुरुष, असे 300 कुटुंबे आहेत. पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पुन्हा गावी येऊन मूळ व्यवसाय करीत आहेत. गावात एकूण 54 अंबर चरखे आहेत, यावर महिला कच्चा माल ज्यात कापसापासून दोरा तयार करून देणे आदी कामे करून देतात. वस्त्र मंत्रालय व विणकर सेवा प्रशिक्षण देऊन दररोज प्रत्येकी 210 भत्ता खात्यावर जमा केला जातो. वागदरीत एकूण 16 हातमाग चालू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT