mangalweda  sakal
सोलापूर

Navaratri 2023 : मंगळवेढ्यात शारदीय नवरात्र महोत्सवाची जोरदार तयारी

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा - शहर व ग्रामीण भागात यंदाच्या नवरात्र महोत्सवासाठी मंडळांनी जोरदार तयारी केली असून, प्रबोधनाच्या देखाव्यांसह विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारीही पूर्ण होत आली आहे.गणेश विसर्जनानंतर अनेक मंडळांना नवरात्रोत्सवाच्या तयारीचे वेध लागतात. यंदा लवकरच तयारी करण्यात आली आहे. नवरात्र महोत्सवात शहरातील २२ मंडळांसह ग्रामीण भागातील एकूण ८२ मंडळांकडून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते.

या मंडळांकडून शहरात सादर केलेले देखावे, विद्युत रोषणाई व इतर प्रबोधनाचे कार्यक्रम पाहण्यासारखे असतात, म्हणून मंगळवेढ्यासह शेजारच्या तालुक्यातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने हे देखावे पाहण्यासाठी येत असतात. देखावे व विद्युत रोषणाई रात्री उशिरापर्यंत सुरू असते. रात्रीच्या वेळी हॉटेल व इतर व्यावसायिक व दुकानदारांची आर्थिक उलाढाल मोठी असते. नवरात्र महोत्सव हा शहरातील व्यापारासाठी, मोठ्या आर्थिक उलाढालीसाठी उपयोगी ठरणार आहे. मंडळांचे अनेक तरुण देवीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला वाजत- गाजत रवाना झाले.

सध्या तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी बनियन व टी-शर्टच्या रूपाने मदत केली. तर तालुक्यातील काही राजकीय नेत्यांच्या नावाने देखील या मदतीत हातभार लागला. ज्योत आणल्यानंतर त्याची मिरवणूक काढत शक्ती देवीची स्थापना करताना अनेक मंडळांनी बँड, लेझीम, डीजेची जोरदार तयारी केली आहे. सराफ गल्ली येथील नवमहाराष्ट्र मंडळाने यंदा केदारनाथ मंदिराचा देखावा केला आहे तर मारुती पटांगणातील जय भवानी मंडळाने देखील दर्शनीय देखावा उभा केला आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

यंदाच्या नवरात्र महोत्सवासाठी ४० पुरुष व १५ महिला होमगार्डचा अतिरिक्त बंदोबस्त लावला असून, महिलांनी दर्शनाला येताना आपापले दागिने सुरक्षित ठेवावेत. मंडळाने आक्षेपार्ह देखावे सादर करू नये. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. डीजेचा आवाज नियंत्रित ठेवावा. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी दिला आहे.

आमच्या मंडळाने यंदा ५५ फुटी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. सालाबादप्रमाणे यंदाचा देखावाही भाविकांच्या पसंतीला उतरणारा आहे. हनुमान तालीम, कोल्हापूरच्या अघोरी नृत्याने यंदाच्या नवरात्र महोत्सवाची सुरवात होणार आहे.

- प्रशांत गायकवाड, अध्यक्ष, नवमहाराष्ट्र तरुण मंडळ, सराफ गल्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! CM एकनाथ शिंदेंच्या बंदोबस्ताला जाताना मोठा अपघात, १२ पोलीस जखमी

Fake SBI Branch: बनावट बँक शाखेचा भांडाफोड; SBIच्या नावे गावकऱ्यांची फसवणूक, लाखो रुपयांना गंडा

अभिनेत्री बोलत असतानाच चालू कार्यक्रमात धाडकन खाली पडला स्टेज; थरारक व्हिडिओ पाहून नेटकरी चिंतेत

Harshvardhan Patil: शरद पवार गटात जाण्याऐवजी... फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना दिला होता पर्याय; ''पण वैयक्तिक प्रगतीपेक्षा...''

Gang Rape in Mumbai: मुंबईत खळबळ! CSMT परिसरात टॅक्सीच्यामागे नेऊन २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT