Motivational Story Sakal
सोलापूर

Motivational Story : स्वमग्नता आजारावर मात करत नवनीतचे तीन प्रेरणादायी पुस्तकांचे लेखन

प्रकाश सनपूरकर

Solapur News : स्वमग्नता (ऑटीझम) नावाच्या आजारातून स्वतःच्या अभिव्यक्तीचा प्रवास यशस्वी करणाऱ्या नवनीत राघवेंद्र कुलकर्णी या मुलाने आतापर्यंत तीन पुस्तकांचे लेखन करत खऱ्या अर्थाने जगात अशक्य काही नाही याचे उदाहरण मांडले आहे.

सोलापुरातील नेहा व राघवेंद्र कुलकर्णी यांच्या कुटुंबात नवनीतचा जन्म झाला. तेव्हा त्याच्या स्वरातील विस्कळितपणा, मित्रासोबत न खेळणे, अपुरी झोप, खाता न येणे ही लक्षणे दिसायला लागली.

या प्रकारांचे निदान करण्यासाठी कुलकर्णी दांपत्याने बंगळुरु येथे तेथे परिग्मा न्यूरो डायगॉन्स्टीक सेंटरमध्ये बेरा व इतर काही तपासण्या केल्यानंतर स्वमग्नता आजाराचे निदान झाले. या आजारावर स्पीच थेरपी, कॉंग्रेटीव्ह बिहेवेरियल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपीचे उपचार झाले.

त्यानंतर तेथील थेरपीस्टने नवनीतच्या आई नेहा कुलकर्णी यांस घरी करण्याच्या उपचाराबद्दलचे प्रोग्रॅमिंग केले. होमिओपॅथीच्या उपचाराने नवनीतची झोपेत सुधारणा व त्याच्या अनियंत्रित हालचाली नियंत्रित झाल्या. फिजीओथेरपीने आणखी काही सुधारणा झाल्या.

त्यांनी नवनीतला एएसी (अल्टरनेटीव्ह ऑफ मेटेंटीव्ह कम्‍युनिकेशन) हा प्रोग्रॅम त्यांनी वापरला. टायपिंगचे शब्द व चित्राच्या मदतीने नवनीत संवाद करू लागला. टॉकिंग फिंगर या पुस्तकात एकूण १७ लेखकांमध्ये नवनीतच्या पुस्तकाचा सहलेखक म्हणून समावेश झाला. नवनीतची पहिली कविता या पुस्तकात प्रकाशित झाली.

त्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षी नवनीतचे पहिले पुस्तक ऑटीझम गॉडस ब्युटीफूल क्रिएशन, डू नॉट जज मी आय एम ॲमेझींग प्रकाशित झाले. नंतर नवनीतचे ॲन्सरींग द अनॲन्सर्ड हे पुस्तक देखील बाजारात आले.

या पुस्तकात रोज येणाऱ्या अडचणीवर त्याचे मत व्यक्त केले आहे. पुस्तकाची विक्री ॲमेझॉनवर केली गेली. त्यानंतर नवनीतचे बॉर्न टू विन हार्ट हे पुस्तक प्रकाशित झाले.यामध्ये त्याने एकूण ५० विषयांवर लेखन केले आहे. त्याच्या लेखनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्काराने दखल घेतली गेली.

नवनीतची कामगिरी

- नवनीतचे पहिले पुस्तक ऑटीझम गॉडस ब्युटीफूल क्रिएशन प्रकाशित

- मिशन ओन्ली कॅपबिलीटीचा ब्रॅंन्ड ॲम्बिसिडर म्हणून आत्मनिर्भर भारत कडुन नियुक्ती

- ऑटीजम पॅरेंटींग मॅगझीनमध्ये माय सेन्सरी सिस्टीम वर्क्स डिफरंटली हा लेख प्रकाशित

- ॲन्सरींग द ॲन्सर्ड हे दुसरे पुस्तक प्रकाशित

- न्युरो डायवरसिटी इंडिया समीटमध्ये पॅनलीस्ट म्हणून नियुक्ती

- लेखनाबद्दल जिल्हा न्यायाधिशांकडून नवनीतचा विशेष गौरव

- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने लेखनाबद्दल विशेष गौरव

- बॉर्न टू वीन हार्ट पुस्तकाचे मध्ये प्रकाशन

- बॉर्न टू वीन हार्ट ला विंग पब्लीकेशन इंटरनॅशनलचा गोल्डन बूक अवार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT