Sharad Pawar sakal
सोलापूर

Sharad Pawar: विधानसभेसाठी पवारांचा पहिला शिलेदार ठरला? जयंत पाटील लावणार फिल्डिंग? 

हुकूम मुलाणी ​

Maharashra Vidahsabha 2024: विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास दोन महिन्याचा अवधी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांना पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्थानिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर दौय्रावर आले होते.त्या दौऱ्यात हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे या मतदारसंघातून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आ. रामचंद्र साळे, स्व.आ.भारत भालके यांना राष्ट्रवादीतून आमदार होण्याची संधी मिळाली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची धुरा हाताळताना या मतदारसंघात मंगळवेढा व पंढरपूर मतदार संघातून 45 हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल शहा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे.शहा यांचे आजोबा स्व.रतनचंद शहा यांनी बँकेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अर्थकारणाला गती दिली.

थेट जनतेतून नगराध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले.शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. सध्या या मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य राहिल्यामुळे महाविकास आघाडीतून राहुल शहा यांना उमेदवारी संतभूमी असलेल्या मंगळवेढ्याला न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली. निवेदनावर शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील,माणिक गुंगे, पंडित गवळी सुरेश कट्टे ,काशिनाथ सावजी, धनाजी चव्हाण ,मुजफर काझी, संतोष रंधवे,स्मिता अवघडे, संगीता कट्टे, नागेश राऊत, लव्हाजी लेंडवे,यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT