Solapur Railway Station Sakal
सोलापूर

Solapur Railway Station: सोलापूर रेल्वेस्‍थानकाला फाईव्ह स्टार लूक; अमृत योजनेतून विभागात ४६५ कोटींची कामे

प्रवाशांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षा देण्याकरिता सोलापूरच्या रेल्वे स्थानकास अमृत योजनेचे बळ मिळत आहे. सर्वाधिक लोहमार्गांचे जाळे असलेल्या देशातील १०० वर्दळीच्या शहरांमध्ये सोलापूरचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

- प्रमिला चोरगी

सोलापूर : सोलापूर रेल्वे विभागात अमृत योजनेतून ४६५ कोटींची कामे मंजूर आहेत. त्यात सोलापूर रेल्वे स्थानकावर भविष्यातील २० वर्षांतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, स्वच्छतागृह, पादचारी पूल, स्थानकाची सुरक्षा यावर भर देणाऱ्या ५६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मूर्तरूप येत आहे.

मागील सात वर्षांपासून रेल्वेच्या विकासाला गती मिळाली आहे. प्रवाशांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षा देण्याकरिता सोलापूरच्या रेल्वे स्थानकास अमृत योजनेचे बळ मिळत आहे. सर्वाधिक लोहमार्गांचे जाळे असलेल्या देशातील १०० वर्दळीच्या शहरांमध्ये सोलापूरचा समावेश आहे.

दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून सोलापूरच्या रेल्वे स्थानकास महत्त्व आहे. अमृत योजनेंतर्गत सोलापूर रेल्वेस्थानक ५० वर्षानंतर कायापालट होत आहे. त्यासाठी ५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या मंजूर निधीतून रेल्वेस्थानकावरील स्वच्छतागृह, पादचारी पूल, सुरक्षा यावर प्रवाशांच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेवर अधिक भर देण्यात आला आहे. मागील दहा वर्षांपासून केंद्राच्या विविध योजनेतून कामे सुरू आहेत.

देशातील इतर रेल्वेस्थानकांच्या तुलनेत सोलापूर रेल्वेस्थानकाने स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वर्षभरातच अमृत योजनेच्या कामांना गती मिळाली आहे. आतापर्यंत ६० टक्के कामे पूर्ण झाले असून, ३९ कोटींच्या प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत.

विभागातील या रेल्वे स्थानकांचा कायापालट

अमृत ​​भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिक सुविधांसह नूतनीकरण करण्यात येत आहेत. तर ५६ स्थानके जागतिक दर्जाच्या टर्मिनसमध्ये रूपांतरित केली जात आहेत.

सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेस्थानकावर सर्व सुविधा उपलब्ध होण्याबरोबर आरामदायी, सोईस्कर आणि आनंददायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळावा, हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये सोलापूर विभागाचाही समावेश आहे. सोलापूरसह विभागातील नगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, बेलापूर, गाणगापूर, दुधनी, जेऊर, कलबुर्गी या स्थानकांचा कायापालट होणार आहे.

दिव्यांगांसाठी १२ मीटरचा पूल

रेल्वे प्रशासनाने १२ मीटरचा रुंदीचा अखंड पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन या पादचारी पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. पूर्वी स्थानकावर तीन मीटर रुंदीचे दोन पूल होते. आता या ठिकाणी तीन मीटरचा एक, सहा मीटरचे दोन आणि १२ मीटरचा एक असे चार पादचारी पूल उभारले जातील.

परिसरातील एक लाख नागरिकांना फायदा

यापूर्वी रेल्वे स्थानकात येण्यासाठी एकच मुख्य प्रवेशद्वार होते. त्यामुळे दमाणीनगर, रामवाडी, सलगरवस्ती, मरिआई चौक, लक्ष्मी-विष्णू चाळ, देगाव या रेल्वेच्या पश्चिम बाजूला राहणाऱ्या प्रवाशांना भय्या चौकातून रेल्वे स्थानकात यावे लागत आणि वाहनतळासाठी कोणतीच सुविधा नव्हती.

पश्चिम भागाकडे मालधक्का असल्याने याठिकाणी दिवसा जाणे देखील प्रवाशांसाठी असुरक्षित होते. आता पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूने प्रवेशद्वार केल्याने या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न दूर करण्याबरोबरच साधारण एक लाख प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

८० टन वजनाचा अर्धचंद्राकृती पोर्च

अर्धचंद्रकार छताची उभारणी, कोरियन कार्पेट लॉन, एईडी दिव्यांचा लख्ख प्रकाशमय दिवे, इंजिनाची बदलण्यात आलेली दिशा, इलेक्ट्रॉनिक ट्रेन डिस्प्ले फलक असा भव्य-दिव्य स्वरूपात सोलापूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आलेल्या पोर्चमुळे स्मार्ट सोलापूरच्या सौंदर्यात भर घातली आहे. यासाठी ८० टन वजनाचे लोखंडी ॲंगलाद्वारे हे पार्च बांधण्यात आले. या कामासाठी साधारण ८० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

प्लॅटफॉर्म क्र. २, ३ वरील सुविधांमध्ये वाढ

शौचालय, पाणी, लिफ्ट, रॅंप, व्हिलचेअर, सरकता जिना या सुविधा आता प्लॅटफार्म क्र. २ व ३ वरदेखील करण्यात येणार आहेत.

पादचारी पुलाला चार मार्ग

रेल्वे स्थानकावरील जुन्या पादचारी पुलाला केवळ प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी दोन मार्ग होते. परंतु नव्याने उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाला चार मार्ग देण्यात येणार आहेत. त्यामध्ये एक रेल्वेस्थानकाबाहेर जाण्यासाठी, दुसरा मार्ग वाहनतळाकडे आणि इतर दोन मार्ग प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्यासाठी त्यामुळे भविष्यात स्थानकावर होणारी गर्दी नियंत्रणात येऊ शकते.

  • सोलापूर विभागासाठी अमृत योजनेंतर्गत : ४५० कोटींचा निधी

  • कायापालट होणाऱ्या स्थानकांमध्ये : सोलापूर, नगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, बेलापूर, गाणगापूर, दुधनी, जेऊर, कलबुर्गी

  • सोलापूर रेल्वे स्थानकासाठी मंजूर निधी : ५६ कोटी

  • आतापर्यंत पूर्ण झालेली कामे : ३५ कोटी

  • सोलापूर रेल्वे स्थानकाची सुरवात : १८८४ मध्ये (होटगी ते गदग)

  • सोलापूर स्थानकाची लांबी : ७०० ते ७५० मीटर

  • एकूण प्लॅटफॉर्मची संख्या : ५ प्लॅटफॉर्मवर १३ ट्रॅक

  • एकूण प्रवाशांची ये-जा : ३५ हजार

  • सोलापूर रेल्वे स्थानकाची श्रेणी : एनएसजी २ श्रेणी

  • स्वच्छ स्थानकामध्ये सोलापूरचे स्थान : ए-वन क्रमांकावर आहे.

अमृत ​​भारत योजनेंतर्गत विभागाचा कायापालट होत असलेले स्थानक एक समृद्ध सोलापूर शहराच्या आकांक्षेसह पायाभूत सुविधा भक्कम करणारी आहे. योजनेतून रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत प्रवासी सुविधांसह अनेक महत्वपूर्ण प्रकल्प विभागांतर्गत केले जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रेल्वे स्थानकाला दोन भव्य प्रवेशद्वार करण्यात आले आहे. या दोन्हीचा वापर प्रवाशांनी करावा जेणे करून गर्दीवर नियंत्रण राहील.

- नीरजकुमार दोहारे, विभागीय रेल्वे, व्यवस्थापक

अमृत योजनेंतर्गत सोलापूर रेल्वे स्थानकावर उत्तम दर्जांची प्रवासी सुविधा दिली जात आहे. स्वच्छता, सुरक्षा आणि स्वच्छतागृह आदी सुविधांना प्राधान्य दिले गेले आहे. भविष्यातील रेल्वेस्थानकावरील वाढती गर्दी लक्षात घेता, सहा, बारा मीटरचे पादचारी पूल उभारण्यात येत आहेत, हेदेखील अत्यंत महत्वाचे आहे. आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाली आहेत, उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण होतील.

- योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक

अमृत योजनेतून रेल्वे स्थानकाची विकासकामे गतिमान पध्दतीने सुरू आहेत. पायाभूत सुविधा देताना प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठीही रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत. सोलापूकरांच्या मागणीनुसार स्लीपर, जनरल डब्यांची संख्या वाढवावी तसेच रेल्वेगाड्यांची संख्या वाढविली पाहिजे.

- संजय पाटील, प्रवासी संघटना

या ठिकाणी रिक्षास्टॉपला स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. स्टेशनच्या आतल्या बाजूला असलेले अधिकृत रिक्षा स्टॉप आहे. परंतु वाढत्या अनधिकृत रिक्षाधारकांमुळे प्रवाशांसह नियमित रिक्षाधारकांनाही याचा त्रास होतो आहे. संयुक्तपणे यावर मार्ग काढावा.

- प्रदीप शिंगे, राज्य प्रवक्ता, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ

पूर्वी

  • ये-जा करण्यासाठी तीन मीटर रुंदीचा एक पादचारी पूल

  • एकाच ठिकाणी वाहनतळाची सोय

  • जनरल वेटिंग हॉल ३० ते ४० प्रवाशांची क्षमता

  • कमी क्षमतेचे एसी वेटिंग हॉल

  • पाच प्लॅटफॉर्म १३ ट्रॅक

  • एकाच बाजूने प्रवेश

  • प्लॅटफॉर्मवर शौचालय व्यवस्था

  • लिफ्ट, रॅंप, एक्सिलेटर जिना नाही

  • जुन्या पद्धतीचे इंडिकेटर

  • परिसरात सुरक्षा भिंत नव्हती

आता

  • ये-जा करण्यासाठी एक नवीन सहा मीटर रुंदीचा आणि १२ मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल

  • नव्याने दोन ठिकाणी वाहनतळाची सोय

  • जनरल वेटिंग हॉलची क्षमता १०० प्रवाशांची

  • एसी वेटिंग हॉलची क्षमता वाढणार

  • पाच प्लॅटफॉर्म १३ ट्रॅक कायम

  • रेल्वेस्थानकावर येण्यासाठी दोन प्रवेशद्वार उपलब्ध

  • प्लॅटफॉर्मवर एकसह इतर प्लॅटफॉर्मवर १० मॉडर्न शौचालय उभारणार

  • लिफ्ट, रॅंप, एक्सिलेटर जिना उभारण्यात येणार

  • न्यू मॉडर्न कोच इंडिकेटर आणि ट्रेन इंडिकेटर लावणार

  • रेल्वे स्थानक परिसरातला सुरक्षा भिंत बांधून रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार समोरील बाजू फाइव्ह स्टार दर्जाचे बनविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT