Solapur News Electric Bike sakal
सोलापूर

Solapur News: प्रदूषित सोलापुरात आता ४,७७८ इलेक्ट्रिक वाहने! शहरात साडेचार हजारांवर ईलेक्ट्रिक दुचाकींची विक्री

सोलापुरात आता पर्यारणपूरक वाहनांची क्रेझ वाढत असून इथले वाढते प्रदूषण रोखण्याला या गाड्यांमुळे थोडाफार तरी हातभार लागणार आहे. अडीचशे मेगावॅटची क्षमता व ताशी २५ किलोमीटर वेग असलेल्या ईलेक्ट्रिक दुचाकीसाठी परवान्याची गरज नाही.

तात्या लांडगे

Solapur News : जूनमध्ये चार हजार ४५८ वाहनांची विक्री झाल्याची नोंद सोलापूर ‘आरटीओ’कडे आहे. त्यात १८६ इलेक्ट्रिक दुचाकी असून सहा मोठी वाहने, १३ इलेक्ट्रिक कार आहेत. दरम्यान, सद्य:स्थितीत सोलापूर शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या चार हजार ७७८ असून त्यात चार हजार ५९१ दुचाकी आहेत. तसेच ८६ कार, १५ रिक्षा, ६५ तीनचाकी मालवाहतूक गाड्यांचाही समावेश आहे.

दरम्यान, वाढती प्रदूषित शहरे म्हणून राज्यातील आघाडीच्या शहरांमध्ये समावेश असलेल्या सोलापुरात आता पर्यारणपूरक वाहनांची क्रेझ वाढत असून इथले वाढते प्रदूषण रोखण्याला या गाड्यांमुळे थोडाफार तरी हातभार लागणार आहे. अडीचशे मेगावॅटची क्षमता व ताशी २५ किलोमीटर वेग असलेल्या ईलेक्ट्रिक दुचाकीसाठी परवान्याची गरज नाही.

दिवसेंदिवस प्रत्येकजण व्यावसायिक दृष्टिकोनातून पुढे जात असतानाच वाहनांची संख्या देखील प्रचंड गतीने वाढू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात दरमहा सहा हजार वाहने वाढतात. देशभरात अशीच स्थिती आहे. प्रदुषणातील लक्षणीय वाढ विचारात घेऊन केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले.

विशेष बाब म्हणजे टॅक्समध्ये सवलत, यांत्रिकी देखभाल कमी आणि मेंटेनन्स खर्च देखील खूपच कमी, ॲव्हरेज जास्त, हप्त्याची रक्कम कमी व पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत चार्जिंगचा खर्च खूप कमी असल्याने अनेकांची पसंती इलेक्ट्रिक वाहने खरेदीलाच आहे. इलेक्ट्रिक दुचाकी घेण्यासाठी सध्या भारतात बऱ्याच वित्तीय संस्था अनुदान देतात.

शिवाय रस्ते कर पूर्ण किंवा काही प्रमाणात माफ केला जातो. भारतामध्ये पेट्रोल दुचाकींवर जो २८ टक्के जीएसटी आकारला जातो, तोच इलेक्ट्रिक दुचाकींवर फक्त ५ टक्के आकारला जातो. भारतात पेट्रोलमुळे होणाऱ्या प्रदूषणात दुचाकींचा जवळपास ६० टक्के, तर वाहनांच्या धुराड्यांतून बाहेर पडणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडमध्ये १३ टक्के वाटा आहे.

शहरांमधील सुक्ष्म कणांच्या प्रदूषणातही दुचाकींचा फार मोठा वाटा आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब केल्यास धुराड्यांतून होणारे उत्सर्जन शून्यावर येईल, असा विश्वास सरकारला आहे. इंधनाच्या किंमतीपेक्षा इलेक्ट्रिक वाहने परवडत असल्याने आता त्या वाहनांची विशेषतः: दुचाकींची विक्री वाढली आहे.

घरच्या घरी करता येईल चार्जिंग

मोबाईल किंवा लॅपटॉप ज्या सहजतेने घरात चार्ज करतो, तितक्याच सहजतेने इलेक्ट्रिक दुचाकी घरात चार्ज करता येते. इलेक्ट्रिक दुचाकी पूर्ण चार्ज करण्यासाठी किमान पाच ते सहा तास लागतात. त्यातून ८० किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो. इलेक्ट्रिक दुचाकी रात्रभरात घरी किंवा दिवसा कामाच्या ठिकाणी काही तासांमध्ये पूर्ण चार्ज होऊ शकते.

आकर्षक फीचर्सची भूरळ

आकर्षक डिस्प्ले, रायडिंग मोड्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नजीकचे चार्जिंग स्टेशन शोधण्याची व दिशादर्शनासाठी ऑनबोर्ड नेव्हिगेशन सुविधा, अशी अनेक आकर्षक वैशिष्ट्ये इलेक्ट्रिक दुचाकीत मिळतात.

इलेक्ट्रिक वाहनांच्या तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होईल, तसतशी या वैशिष्ट्यांची यादी वाढतच जाईल. कमी किलोवॅटच्या गाड्यांना लायसन्सची देखील गरज भासत नाही.

दहा हजाराच्या सवलतीमधून प्रोत्साहन

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचेदेखील प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर,पर्यावरणपूरक अर्थात इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतुने अशी दुचाकी खरेदी करताना गाडीच्या किमतीवर थेट दहा हजारांची सवलत दिली जात आहे.ही सवलतदेखील पर्यावरणपूरक वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन ठरत आहे.

जिल्ह्यात एकूण १५ लाखांवर वाहने

सोलापूर जिल्ह्यात सध्या १५ लाखांहून अधिक वाहने आहेत. सोलापूर ‘आरटीओ’कडे ११ लाख ८१ हजार ४३० वाहनांची नोंद आहे.

त्यात नऊ लाख ४२ हजार १३९ दुचाकी तर ८० हजार ४१६ कार आहेत. १६ हजार जीप, १६ हजार ६४० ॲटोरिक्षा, १८ हजार ३४० ट्रक, २३ हजारांवर मालवाहतूक वाहने आहेत. ४९ हजार ७०१ ट्रॅक्टर तर १६ हजार १९५ ट्रेलर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

High Court : ... तर तरुणाईचे आयुष्य होणार उद्ध्वस्त, उच्च न्यायालय : तस्करीला रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT