सोलापूर : सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना लसीसंदर्भात असणारी उपलब्धता आणि पुरवठा याकडे लागले आहे. त्यातूनच कोव्हिड लस मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या जगभरातील कित्येक दशलक्ष लोकांना एक पाऊल जवळ आणण्यासाठी फेसबुक एक जागतिक मोहीम राबवीत आहे.
पूर्वी फेसबुकने दोन अब्जहून अधिक लोकांना अधिकृत कोव्हिड -19 माहितीशी कनेक्ट केले आहे. आता जगातील बहुतांश देश सर्व प्रौढांच्या लसीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच प्रत्येकासाठी लसीकरण सुलभ व्हावे यासाठी फेसबुक टीम एका फीचरवर कार्य करीत आहे. यातून आपल्याला लस कधी आणि कुठे मिळेल याबाबत माहिती मिळेल.
ही कोव्हिड माहिती केंद्रातील अपडेट माहिती न्यूज फीडमार्फत आपणाला मिळणार आहे. तसेच लोक लसीकरण केंद्र शोधण्यासाठी फेसबुकचा वापर करत असल्याचे फेसबुकला लक्षात आले. म्हणून फेसबुक या सेवेसाठी विशेष प्रयत्न करणार आहे.
तसेच इन्स्टाग्रामवरसुद्धा कोन्व्हिड इन्फॉर्मेशन सेंटर आणत आहे; जेणेकरून इन्स्टाग्राम युजर्ससुद्धा या सेवेचा लाभ घेतील. यातील विशेष बाब म्हणजे लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्य व शहर पातळीवरील आरोग्य अधिकारी आणि सरकार यांच्याशी व्हॉट्सऍपद्वारे समन्वयसुद्धा साधले जाणार आहे. त्यामुळे लसीकरणाची अद्ययावात माहिती मिळवण्यात सुद्धा मदत होईल, हे मात्र नक्की. यासंबंधीची सर्व अधिकृत माहितीही फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे.
युजर्सना याचा फायदा काय?
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.