प्रणितींच्या वाढदिवशीच कॉंग्रेसला धक्का! खरटमल समर्थकांचा NCP प्रवेश Esakal
सोलापूर

प्रणितींच्या वाढदिवशीच कॉंग्रेसला धक्का! खरटमल समर्थकांचा NCP प्रवेश

प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवशीच कॉंग्रेसला धक्का! खरटमल समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले खरटमल यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या वाढदिवशीच धक्का दिला आहे.

सोलापूर : सुधीर खरटमल (Sudhir Kharatmal) यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) जाहीर प्रवेश केला आहे. लष्कर येथील बेरिया हॉलमध्ये हा प्रवेश कार्यक्रम झाला. कॉंग्रेसमधून (Congress) राष्ट्रवादीत आलेले खरटमल यांनी आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना त्यांच्या वाढदिवशीच धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव (Bharat Jadhav) यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर तथा नगरसेवक महेश कोठे (Mahesh Kothe), नगरसेवक तौफीक शेख (Tawfiq Shaikh), माजी महापौर नलिनी चंदेले (Nalini Chandele), महिला अध्यक्षा सुनीता रोटे, लता ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. (On Congress MLA Praniti Shinde birthday Kharatmal supporters joined the NCP)

खरटमल यांच्या सुमारे 200 समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी माजी महापौर कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सुधीर खरटमल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जावेद शिकलकर, गोविंद कांबळे, रोहित खिलारे, उपाध्यक्ष सोपान थोरात, माजी शिक्षण मंडळ सदस्य विठ्ठल होनमारे, सूर्यकांत शेरखाने, मौला चॉंदा, प्रभाकर सोनगीवाले, वैभव वाडे, तन्वीर मणियार, स्वप्निल गायकवाड, अन्वर बागवान, कॉंग्रेसचे सचिव द्वारकाप्रसाद तावनिया, राहुल गांधी विचार मंचचे शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड, मोची समाजाचे रथोत्सव अध्यक्ष प्रवीण वाडे, कॉंग्रेसच्या महिला प्रभाग अध्यक्ष सुनंदा होटकर, युवक कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष युवराज पंतुवाले, सागर होटकर, निलेश होटकर, कृष्णा धुळराव, राजू कोरे, हिमाद शेख, रवींद्र शिंदे, अण्णा पवार, करेप्पा जंगम, सनी मेह्त्रे, गौरव पात्रे अशोक आयगोळे, वनिता गिरी, मंजू चव्हाण, प्रीती बंतल, समीरा शेख, परवीन सिंदगीकर, कांचन पवार आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे निष्ठावंत अन्वर अन्याय होत आहे. खरटमल यांच्यावरही कॉंग्रेसने अन्याय केला आहे. खरटमल ज्याप्रमाणे तुम्हाला कॉंग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक मिळत होती, त्यापेक्षा जास्तच वागणूक तुम्हाला राष्ट्रवादीतही मिळेल. खरटमल यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचाही सन्मान केला जाईल. कॉंग्रेसमध्ये जी पदे होती तीच पदे या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये दिली जातील.

- महेश कोठे, माजी महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT