Ashadhi Ekadashi esakal
सोलापूर

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला दहा लाखाहून अधिक वैष्णव पंढरीत दाखल

श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लागत आहे वीस ते बावीस तासांचा अवधी

राजकुमार घाडगे

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला दहा लाखाहून अधिक वैष्णवांचा मेळा पंढरीत दाखल झाला आहे. मंगळवारी (ता.१६) आषाढी दशमी दिवशी पहाटेपासूनच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानाची पर्वणी साधली होती. दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सर्व पत्रा शेड भरून गोपाळपूर रस्त्याच्याही पुढे गेली होती. श्री विठ्ठलाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी आज जवळपास २० ते २२ तास तर मुखदर्शनासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागत होता.

'भेटी लागी जीवा लागलीसे आस!' तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने मानाच्या पालख्यांनी दशमी दिवशी वाखरी पालखी तळावरून पंढरीकडे प्रस्थान केले होते. मंगळवारी सायंकाळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालखी आणि दिंड्यांनी पंढरीत प्रवेश केला. यावेळी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे पंढरपूरकरांनी स्वागत केले. दरम्यान आषाढी यात्रेला आलेल्या लाखो भाविकांच्या विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. आषाढी यात्रेला आलेले भाविक चंद्रभागा नदी मध्ये स्नान करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे दशमी दिवशी नदीमध्ये स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे चंद्रभागा वाळवंट फुलले होते.

चंद्रभागा नदीत यंदा मुबलक पाणी असल्यामुळे भाविकांनी चंद्रभागा स्नानाचा आनंद मनसोक्त लुटला. स्नान करून आल्यानंतर महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी प्रशासनाने १० ठिकाणी चेंजिंग रूम उभारल्या आहेत. तर महाद्वार घाटासह इतर सर्व घाटांवरून नदी स्नानासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने लोखंडी बॅरिकेटच्या सहाय्याने नियंत्रण ठेवण्यात येत होते. दरम्यान मंगळवारी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्याच्याही पुढे गेली होती. श्री विठ्ठल मंदिरातून पदस्पर्शदर्शन घेऊन बाहेर आलेले प्रकाश अर्जुन मगदूम (रा.आरबावी,ता. गोकाक,जि.बेळगाव)' सकाळ' शी संवाद साधताना म्हणाले, सोमवारी सकाळी अकरा वाजता गोपाळपूर रस्त्यावरील दर्शन रांगेमध्ये उभे होतो. सुमारे बावीस तासानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. प्रशासनाने दर्शन रांगेमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्यामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही.

श्री विठ्ठलाच्या मुखदर्शनाची रांग प्रदक्षिणा रस्त्यावरून कालिका देवी चौकाच्या पुढे परिचारक वाड्यापर्यंत गेली होती. श्री विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी दोन ते तीन तास लागत होते. श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले गणेश जगन बोराडे (राहणार शिनोली, ता. आंबेगाव, जि.पुणे) म्हणाले, मुखदर्शनाची रांग ही मंदिर परिसरातील अरुंद गल्लीबोळातूनच जात प्रदक्षिणा मार्गावर येते. या रस्त्यावर नगर प्रदक्षिणेला निघालेल्या दिंड्यांची अलोट गर्दी असते. त्यामुळे मुखदर्शनाच्या रांगेत विस्कळीतपणा येऊन भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने मुखदर्शनच्या रांगेकरिता स्वतंत्र सोय करावी अशी सर्व भाविकांची आग्रहाची मागणी आहे.

पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने प्रमुख चौकात वारकरी पुतळे उभारून भजन कीर्तनात दंग असलेली दिंडी व इतर आध्यात्मिक प्रसंग साकारण्यात आले आहे. याशिवाय शहरातील प्रमुख रस्त्यांवर जागोजागी विद्युत माळांच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शहर उजळून निघाले आहे. रस्ते दुभाजका मधील विजेच्या खांबावर विविध संतांच्या प्रकाशमान प्रतिमा बसविण्यात आल्या आहेत. तसेच शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण व्हावे म्हणून स्पीकर द्वारे विविध गायकांच्या मधुर आवाजातील भक्ती गीते व भावगीते लावून पंढरीत आलेल्या भाविकांचे स्वागत केले जात आहे. अशा भक्तिमय वातावरणामुळे अवघी पंढरी नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT