Marriage Esakal
सोलापूर

एक मुलगी, अनेकांसोबत जमविले विवाह! सांगोला, साताऱ्यातील तरुणांना फसवणारे जेरबंद

लग्नाचे आमिष देऊन पैसे व दागिने लुटणारी टोळी फौजदार चावडी पोलिसांनी संतोष काशिनाथ गवंडी, भारती चंद्रकांत पवार (दोघेही रा. धुतर्गी तांडा, विजयपूर) यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 80 हजाराची रोकड व दोन तोळे दागिने जप्त केले. त्यांनी यापूर्वी एकच मुलगी दाखवून सोलापूर, सांगोला, साताऱ्यातील तरुणांनाही अशाच पध्दतीने फसविल्याची तर काहींना पैशाची मागणी केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : लग्नाचे आमिष देऊन पैसे व दागिने लुटणारी टोळी फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केली. संतोष काशिनाथ गवंडी, भारती चंद्रकांत पवार (दोघेही रा. धुतर्गी तांडा, विजयपूर) यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 80 हजाराची रोकड व दोन तोळे दागिने जप्त केले आहेत. त्यांनी यापूर्वी एकच मुलगी दाखवून सोलापूर, सांगोला, साताऱ्यातील तरुणांनाही अशाच पध्दतीने फसविल्याची तर काहींना पैशाची मागणी केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. त्यांच्या मोबाईलवरून पोलिस अधिक माहिती घेत आहेत. त्यानंतर संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.

घटनेची हकीकत अशी, सोलापुरातील संतोष पवार नावाच्या व्यक्तीने आमच्या मुलीचा विवाह करायचा असून आमचा संसार पुरात वाहून गेल्यामुळे कोणतीच कागदपत्रे नाहीत. आमचे कोणी पाहुणेदेखील नाहीत, असे कडलास (ता. सांगोला) येथील जाधव कुटुंबियांना सांगितले. तसेच आम्ही गरीब असल्याने विवाहाच्या तयारीसाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी जाधव कुटुंबीयांनी त्यांना 80 हजार रुपये रोख दिले. मुलगी बघायला आल्यावर गडबडीत साखरपुडा उरकला. 16 मार्च रोजी विवाह करण्याचे ठरले. विवाहाच्या एक दिवस अगोदर नवरीला आणायला मुलाचे आजोबा सोलापुरात आले. त्यावेळी मुलीचे दागिने घेऊन या, असे समोरील व्यक्‍तींनी बजावले. त्यानुसार मुलाचे आजोबा दोन तोळे सोने घेऊन आले. दागिने घेऊन एसटी स्टॅण्डवर या तेथून मुलीला घेऊन आपण गावाकडे जाऊ, असे संशयित आरोपी संतोष याने सांगितले. मुलाचे आजोबा मनोहर जाधव हे एसटी स्टॅंडवर आले. त्यावेळी संतोष गवंडी याने त्यांना दुचाकीवर बसवून हिराचंद नेमचंद वाचनालयाजवळ आणले. त्यावेळी पवारसोबत दोन महिला होत्या. त्या महिला म्हणाल्या, आम्ही मुलीला बांगड्या घेण्यासाठी नवीपेठत आलो आहोत. ते सोने द्या आम्ही आमची अपंग नातलग आहे, तिला दाखवून आणतो. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून जाधव यांनी ते दागिने त्यांना दिले. काहीवेळाने संतोष हादेशील तेथून पसार झाला. चार वाजेपर्यंत वाट पाहूनही ते न आल्याने त्यांनी गावाकडे फोन करून मुलाला व सुनेला आणि नवऱ्या मुलाला बोलावून घेतले. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे समजले. त्यांच्या मोबाईलमधील 'सीडीआर' रिपोर्ट काढण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरु आहे. सध्या या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रसंगावधान, अन्‌...
जाधव कुटुंबियांच्या फसवुणकीची माहिती संभाजी ब्रिगेडचे सांगोला तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ यांनी सोलापूर शहराध्यक्ष शाम कदम यांना दिली. शहराध्यक्ष कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष गजानंद शिंदे, संघटक मल्लू भंडारे यांनी जाधव यांची भेट घेऊन फौजदार चावडी पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी तत्काळ त्या आरोपींचे मोबाइल लोकेशन शोधून काढले. जुळे सोलापुरातील कल्याण नगर येथे त्यांचे लोकेशन दाखविले आणि पोलिसांनी संशयितांना पकडले. पळून जाण्याचा प्रयत्न करताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT