Maharashtra Police esakal
सोलापूर

सोलापुरात २८८ गावांमध्ये ‘एक गणपती’! गणेशोत्सवात साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त

सामाजिक सलोखा राखून गावातील सर्वांनी एकत्रित येऊन हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याच्या हेतूने जिल्ह्यात ‘एक गाव - एक गणपती’ उपक्रम राबविला जातो. यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील २८८ गावांमध्ये एकच गणपती असणार आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : सामाजिक सलोखा राखून गावातील सर्वांनी एकत्रित येऊन हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याच्या हेतूने जिल्ह्यात ‘एक गाव - एक गणपती’ उपक्रम राबविला जातो. यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील २८८ गावांमध्ये एकच गणपती असणार आहे. त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी तब्बल सव्वानऊशे बैठका घेतल्या.

ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या मदतीने तालुकानिहाय गणशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यावेळी सर्वांनी शांतता व सुव्यवस्था सांभाळून लोकहिताचे उपक्रम घ्यावेत, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, कोरोनाबद्दल जनजागृती करावी, असे आवाहन केले. तसेच गणेशोत्सवात डीजेला परवानगी नसेल, असेही स्पष्ट केले. ३० ऑगस्टपर्यंत ग्रामीणमधून एक हजार ९५० मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी १४० मंडळांचे परवाने नाकारण्यात आले असून, त्यात त्रुटी होत्या तथा काहींनी दोनदा अर्ज केले होते. आतापर्यंत ग्रामीण पोलिसांनी जवळपास दीड हजार मंडळांना उत्सव परवाना दिला आहे. शहरातील एक हजार २४४ गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४९७ मंडळांना पोलिसांनी उत्सवाचा परवाना दिला. आता ७४७ मंडळांचे अर्ज पोलिसांकडे प्रलंबित असून त्यांच्या मंडप, वीज कनेक्शन व जागेची पाहणी करून त्यांना परवानगी देण्याची कार्यवाही सुरू आहे. उद्या (बुधवारी) त्या मंडळांना परवाने मिळणार आहेत.

गणेशोत्सवात साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेशोत्सव काळात सोलापूर शहरात तीन पोलिस उपायुक्त, आठ सहाय्यक पोलिस आयुक्त, २५ पोलिस निरीक्षक, ७४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह ८५१ पोलिस अंमलदार आणि एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी व ५०० होमगार्ड असा बंदोबस्त राहणार आहे. दुसरीकडे, ग्रामीणमधील ११ तालुक्यांमध्येही पोलिसांचा चोख बंदोबस्त राहील. सात पोलिस उपअधीक्षक, २५ पोलिस निरीक्षक, १३५ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, सोळाशे पोलिस अंमलदार, दोन राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकड्या आणि ९०० होमगार्ड असा ग्रामीणमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असेल. पोलिस पाटलांचीही त्यासाठी मदत घेतली जात आहे.

शांतता, सुव्यवस्था राखून साजरा करा आनंदोत्सव

सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव काळात सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवावेत. डीजे तथा मोठ्या आवाजाच्या वाद्यांवर निर्बंध राहतील. सर्वांनी शांतता, सुव्यवस्था जपत गणेशोत्सव आनंदात साजरा करावा.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT