रंग हरवलेल्या शाळांच्या भिंती आता बोलू लागल्या आहेत. सामान्य ज्ञान, भौगोलिक माहिती, बाराखडी आणि एबीसीडीचे शब्द या भिंतींवर उमटले आहेत.
सोलापूर : शासकीय इमारत म्हटलं की कोपऱ्यात पानाच्या अन् गुटख्याच्या पिचकाऱ्या, डुकरांचा अन् कुत्र्यांचा वावर, दिवसा शाळा आणि रात्री तळिरामांचा अड्डा असेच काहीसे आजपर्यंतचे चित्र होते. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या (ZP School) इमारती मात्र आता या सर्वांना अपवाद ठरू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या "स्वच्छ शाळा - सुंदर शाळा' अभियानासाठी मदतीचे हजारो हात पुढे आले. बघता बघता जिल्ह्यातील एक हजार शाळांचे रूपडेच या अभियानातून पालटून गेले आहे.
रंग हरवलेल्या शाळांच्या भिंती आता बोलू लागल्या आहेत. सामान्य ज्ञान, भौगोलिक माहिती, बाराखडी आणि एबीसीडीचे शब्द या भिंतींवर उमटले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये क्रेझ असलेले कार्टूून असोत की आकर्षक चित्रे, यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या भिंती आता बोलक्या झाल्या आहेत. "माझी शाळा - सुंदर शाळा' अभियानातून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडेच बदलू लागले आहे. जिल्ह्यातील जवळपास एक हजार शाळा स्वच्छ आणि सुंदर झाल्या आहेत. शाळा सुंदर झाल्याने विद्यार्थी ज्यावेळी शाळेत येतील त्यावेळी त्यांच्या शिकण्याचा उत्साह द्विगुणीत होणार आहे. या अभियानासाठी जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांसह त्या त्या गावातील दानशूर व्यक्ती व संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. लोकवर्गणीतून जमा झालेल्या लाखो रुपयांच्या देणगीतून गावातील ज्ञानमंदिरे सजली आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार 798 प्राथमिक शाळा आहेत. जवळपास या शाळांच्या तीन हजार इमारती आहेत. कोरोनामुळे शाळा बंद आहेत परंतु ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. शाळेचा परिसर व शाळेच्या इमारतीत स्वच्छ व सुंदर असाव्यात यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान हाती घेतला आहे.
या उपक्रमाला शिक्षकांसह शिक्षक संघटना व गावांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या अभियानातून झालेल्या कामाचा आढावा 30 ऑगस्ट रोजी घेतला जाणार आहे. ज्या तालुक्यांमध्ये या अभियानाचे काम संथपणे सुरू आहे त्या तालुक्यांमधील कामाचा वेग येत्या काळात वाढवला जाणार आहे.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.