Vaccine Esakal
सोलापूर

18 वर्षांवरील तरुणांनो, लस घ्यायचीय का? मग 'अशी' करा नोंदणी

18 वर्षांवरील तरुणांनो, लस घ्यायचीय का? मग अशी करा नोंदणी

तात्या लांडगे

ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार नाही, असे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर : ग्रामीणमधील 18 वर्षांवरील तरुणांना मंगळवारी (ता. 10) 15 केंद्रांवरून कोरोनाची (Covid-19) लस (Vaccine) टोचली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार (Vaccinatiob) नाही, असे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे (Dr. Aniruddh Pimpale) यांनी स्पष्ट केले आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्यांनाच लस मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

लसीकरणासाठी ऑन द स्पॉट नोंदणी बंद केल्याने ज्यांनी ऑनलाइन नोंदणी करून शेड्यूल घेतले आहे, त्यांनाच लस मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील तरुणांसाठी मंगळवारी (ता. 10) अक्‍कलकोट ग्रामीण रुग्णालय, पांगरी, माढा, कुर्डुवाडी, माळशिरस, नातेपुते, मंगळवेढा, मोहोळ, करकंब, वडाळा व मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. तसेच करमाळा व अकलूज उपजिल्हा रुग्णालय आणि पंढरपूर व बार्शी नागरी आरोग्य केंद्रातही लसीकरण असणार आहे. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे तीनशे डोस देण्यात आले आहेत. 18 वर्षांवरील तरुणांना कोवॅक्‍सिन लस टोचली जाणार आहे.

जिल्ह्यातील 35 लाख 78 हजार 32 लाभार्थींना लस टोचणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ग्रामीणमधील पाच लाख 24 हजार 534 जणांनी पहिला डोस तर एक लाख 82 हजार 295 जणांनी दुसरा डोस टोचून घेतला आहे. त्यात 18 ते 45 वयोगटातील एक लाख 11 हजार 730 तरुणांचा समावेश आहे. दुसरीकडे शहरातील 71 हजार 633 तरुणांसह दोन लाख 51 हजार 98 जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी 83 हजार 192 व्यक्‍तींना दुसरा डोस मिळाला आहे. लसीकरणाचा दहा लाखांचा टप्पा पूर्ण झाला, परंतु दुसऱ्या डोस घेणाऱ्यांची संख्या कमीच असल्याची स्थिती आहे. आगामी काळात पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोसचा कालावधी पूर्ण केलेल्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जाईल, असे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

लसीकरणासंदर्भात ठळक बाबी...

  • www.cowin.gov.inअथवा "आरोग्य सेतू' यावर करावी लसीकरणासाठी नोंदणी

  • लाभार्थींनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व रेफरन्स आयडी सोबत आणावा

  • दुसरा डोस टोचण्यासाठी लाभार्थींनी पहिल्या डोसवेळी नोंदवलेला मोबाईल क्रमांक व रेफरन्स आयडीसह उपस्थित राहावे

  • लाभार्थींना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लसीकरणासंदर्भात चार अंकी रेफरन्स कोड येईल

  • लस टोचताना तो कोड टाकल्यानंतर संबंधित लाभार्थीला लस टोचली जाणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

SCROLL FOR NEXT