Pandharpur Canva
सोलापूर

परवानगी असलेल्या पालख्यांनाच मिळणार पंढरपुरात प्रवेश !

परवानगी असलेल्या पालख्यांनाच मिळणार पंढरपुरात प्रवेश !

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

परवानगी नसलेल्या पालख्या, दिंड्या तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसने पंढरपुरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालख्या, दिंड्या तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले (Sachin Dhole)) यांनी केले. (Only palanquins allowed on the occasion of Ashadhi Ekadashi will get admission in Pandharpur)

आषाढी वारी नियोजनाबाबत येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारातील सांस्कृतिक भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम उपस्थित होते.

प्रांताधिकारी ढोले म्हणाले, आषाढी वारी ही कोरोनाच्या संकट काळात पार पडत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला असून, वारी प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडण्यासाठी देण्यात आलेली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी. नगरपालिकेने वाखरी पालखी तळावरील अनावश्‍यक काटेरी झुडपे काढून स्वच्छता करावी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, मंडपाची व्यवस्था करावी. प्रदक्षिणा मार्गावर आवश्‍यक ठिकाणी रस्ते दुरुस्ती व तात्पुरते बॅरिकेडिंग करावे. नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने परवानगी दिलेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी व भाविकांची आरोग्य तपासणी करावी. आरोग्य विभागाने ऑक्‍सिजन, रक्तपुरवठा, औषधसाठा मुबलक प्रमाणात राहील याबाबत नियोजन करावे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी या वेळी दिल्या.

मंदिर समितीने महापूजा व इतर विधी पार पाडताना योग्य नियोजन करावे, कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. आषाढी एकादशी दिवशीच्या शासकीय पूजेस उपस्थित राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. महावितरण विभागाने वारी कालावधीत वीज पुरवठा अखंडित व सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी. पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही श्री. ढोले यांनी या वेळी दिल्या. या वेळी बैठकीत सार्वजनिक बांधकाम, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध, उपप्रादेशिक आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT