सोलापूर जिल्ह्यातून फक्त एक हजार २३० क्विंटल मालाची हमीभावाने खरेदी sakal
सोलापूर

Soyabean Purchase : सव्वा लाख हेक्टरवर सोयाबीन, खरेदी केंद्रे दोनच!

सोलापूर जिल्ह्यातून फक्त एक हजार २३० क्विंटल मालाची हमीभावाने खरेदी

सकाळ वृत्तसेवा

Soyabean Purchase in Solapur : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात एक लाख ३८ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. मात्र, हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही पणन विभागाने हमीभावाने खरेदीसाठी केवळ दोनच खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. तर फक्त ८९ शेतकऱ्यांकडून एक हजार २३० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

सरकारने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल चार हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना आठ केंद्रांना मंजुरी दिली असून, त्यापैकी बार्शी व मानेगाव या दोन ठिकाणी पणन विभागाने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ३८ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असताना विलंबाने आणि कमी ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांची बोळवण केली गेली आहे.

मॉईश्चर (ओलावा) मुळे अद्याप सोयाबीनची आवक नसल्याने अन्य ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू केले नसल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. सध्या सोलापूरच्या बाजार समितीतच दररोज सुमारे एक हजार पोती सोयाबीनची आवक आहे. दोन दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल चार हजार २०० ते ३०० रुपये असलेला दर शुक्रवारी (ता. २५) साडेचार हजारांवर पोचला तरी शेतकऱ्यांना ४०० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

सोलापूर, अक्कलकोटला खरेदी केंद्राची गरज

जिल्ह्यात उत्तर सोलापूर १७५२४, दक्षिण सोलापूर ७८९९, अक्कलकोट १३६१७ हेक्टर तर बार्शीत सर्वाधिक ८८९८५ हेक्टरवर सायोबीनची पेरणी झाली आहे. बार्शी तालुक्यात दोन केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र, सोलापूर व अक्कलकोटला अद्याप खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत. या दोन्ही ठिकाणी तातडीने खरेदी केंद्र सुरू होण्याची गरज आहे.

फक्त ७४७ शेतकऱ्यांची नोंदणी

जिल्ह्यातील बार्शी ४५८, मानेगाव २२२, अक्कलकोट ६४, पंढरपूर ३ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. तर ८९ शेतकऱ्यांकडून एक हजार २३० क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. यावरून हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही केवळ एक टन मालाची खरेदी झाली आहे.

ओलाव्यामुळे अद्याप शेतकरी सोयाबीन विक्रीस येताना दिसत नाही. सध्या बार्शी, मानेगावात केंद्र सुरू असून सोयाबीन खरेदीनंतर  चार ते आठ दिवसांत बिल दिले जात आहे.  कुर्डुवाडी, पंढरपूर, माळकवठे, करमाळा, मंगळवेढा येथून हमीभाव खरेदी केंद्राची मागणी नाही. लवकरच सोलापूर, अकलूज व वैराग येथे खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे.  शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करावी.

- हरिदास भोसले, पणन अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

SCROLL FOR NEXT