Samadhan Autade Sakal
सोलापूर

Samadhan Autade : मतदारसंघातील जनतेची नाराजी दूर करण्याची आमदार आवताडेंना संधी!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना 45 हजाराचे मताधिक्य मिळाले.

हुकूम मुलाणी ​

काँग्रेसच्या एका नेत्याने हे मताधिक्य कार्यकर्त्याच्या प्रयत्नाचे नसून लोकांच्या रोषामुळे वाढल्याचे कृतज्ञता मेळाव्यात जाणवून दिले.

मंगळवेढा : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना 45 हजाराचे मताधिक्य मिळाले असले, तरी तीन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नागरिकांचे प्रश्न सुटल्यास तशी परिस्थिती राहणार नाही. त्यासाठी आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना जनतेची नाराजीच्या दुरूस्तीची मिळणार आहे.

यापूर्वीच्या दोन खासदाराच्या नाराजीचा फटका या मतदारसंघात झाल्यामुळे त्याचे रूपांतर विरोधी वातावरण निर्माण करण्यात झाले. परिणामी, या मतदारसंघातून 45 हजाराचे मताधिक्य मिळाल्याने सध्या महाविकास आघाडीचे नेत्यांचा आत्मविश्वास वाढला. काँग्रेसच्या एका नेत्याने हे मताधिक्य कार्यकर्त्याच्या प्रयत्नाचे नसून लोकांच्या रोषामुळे वाढल्याचे कृतज्ञता मेळाव्यात जाणवून दिले. परंतु, लोकसभा निवडणुकीत आवताडे त्यांच्या बहुतांश समर्थकाने दादा एवढ्या वेळ सांगू नका विधानसभेला तुमच्याबरोबर आहे, असे शब्द अनेक गावातून त्यांना ऐकावयास मिळाले.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनीच गांभीर्याने घेतली नाही, जर या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले त्याचे श्रेय दुसऱ्यालाच मिळेल या लालसेने प्रचार यंत्रणा हाताळली नाही. मात्र, उलट आता विधानसभेला याचे चित्र वेगळे राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत 2 लाख 12 हजार इतके मतदान या निवडणुकीत झाले असले तरी विधानसभेत या आकड्यामध्ये आणखीन 40 ते 50 हजार मताची वाढ होऊ शकते. भाजपपासून दुरावलेला मतदार पुन्हा जवळ करण्यासाठी आ. आवताडे यांना संधी आहे. तालुक्यातील 80 मधील फक्त दहा गावात भाजपला मताधिक्य मिळाले आहे उर्वरित गावातून मताधिक्य घेण्यासाठी त्यांनी गावनिहाय बैठका घेऊन कोट्यावधी रुपयाचा निधी प्रत्येक गावात दिल्याचे सांगितले जाते निधीप्रमाणे काम झाले का?

लोक आपल्यापासून का दूर गेले, का आपलाच कार्यकर्ता लोकांच्या संपर्कात नाही यासाठी आढावा घेण्याची गरज आहे. यातून झालेल्या चुकांची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात अधिकाय्रासमवेत गावभेट दौरा करून लोकांचे प्रश्न जागेवरच कसे सुटतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे सध्या गतवर्षीच्या खरीप पिक विम्यात अजून बहुतांश शेतकरी वंचित आहेत त्यांच्या तक्रारी विमा कंपनीने चुकीचे निकष लावून निकाली काढल्या, महावितरणच्या वादळात झालेल्या विजेच्या खांबाचे नुकसानीनंतर वाड्यावर असतील वीज पुरवठा पूर्ववत केला नाही त्यासाठी मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करणे गरजेचे आहे.

महसूल खात्याच्या आखत्यारीत शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.तीच परिस्थिती महा ई सेवा केंद्राच्या बाबतीत दाखले करताना निर्माण झाली. वादळाने झालेल्या घराच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे, जलजीवन योजनेची ज्या गावात कामे पूर्ण झाले तरी त्या गावात अजूनही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पंचायत समितीकडून 4 कोटी 80 लाखाच्या नवीन विहिरीच्या कामाला सुरुवात झाली नाही. पंचायत समिती प्रशासन नाही, तालुक्यातील शेतकरीला खेळवत ठेवले. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आधारित असलेल्या अनेक रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याच्या कडेला तुटलेल्या झाडाच्या फांद्या देखील तोडण्याचे औदार्य संबंधित खात्याकडून दाखवले जात नाही. बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचनमध्ये बॅरेजचा समावेश करून या योजनेच्या कामाला सुरुवात होणे गरजेचे आहे. शिवाय, महात्मा बसवेश्वर, चोकोबा स्मारकाचा देखील प्रश्न राज्यस्तरावर रखडलेला आहे. हे प्रश्न विधानसभा निवडणुकीपूर्वी सुटणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य केंद्र व राज्यातील सत्तेचा उपयोग करून घेतला पाहिजे, अन्यथा गाव आपल्याच मागे आहे असे सांगणाऱ्यावर विश्वास ठेवला तर लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होऊन भविष्यात अवताडे यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT