4bibtya_33 (2) - Copy.jpg 
सोलापूर

नऊजणांचा खात्मा करणाऱ्या बिबट्याला ठार करण्याचे आदेश ! करमाळ्यात सहा दिवसात तीन बळी

तात्या लांडगे

सोलापूर : बीड, नगरमार्गे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यात आलेल्या बिबट्याने 16 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या काळात नऊजणांचा बळी घेतला आहे. तर तिघांना गंभीर जखमी केले आहे. नरभक्षक बिबट्या घातक ठरू लागल्याने संबंधित करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी बिबट्याला ठार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वन विभागाकडे केली होती तर माजी आमदार नारायण पाटील यांनी वनमंत्र्यांनाच फोन केला होता. त्यानंतर रविवारी (ता. 6) राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी त्या बिबट्याला पिंजरा लावून तथा बेशुध्द करुन पकडणे शक्‍य नसल्यास गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी दिली आहे. 

ठळक बाबी...

  • नगर, बीड व सोलापूर जिल्ह्यातील नऊजणांचा बिबट्याने घेतला बळी तर तिघे जखमी
  • 16 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत बिबट्याने केला नऊजणांचा खात्मा
  • मागील सहा दिवसांत करमाळा तालुक्‍यातील तिघांची बिबट्याने केली शिकार
  • प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी बिबट्याला ठार करण्याचे दिले आदेश
  • पिंजऱ्याद्वारे पकडा तथा बेशुध्द करुन पकडण्याचा करावा प्रयत्न; शक्‍य नसल्याने गोळ्या घालण्यास परवानगी
  • औरंगाबाद व पुणे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांनी प्राधिकृत केलेल्यांनाच असेल बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी

नरभक्षक बिबट्याने शेतकरी व शेतमजुरांसह उसतोड कामगारांना शेतात जाणे मुश्‍किल केले आहे. झाडाआड प्रसंगी झाडावर लपून बसलेला बिबट्या अनेकांना दिसला, परंतु त्याला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पकडू शकलेले नाहीत. तत्पूर्वी, शेतात कामानिमित्त गेल्यानंतर तथा कामावरुन घरी परतताना बिबट्याने हल्ले केले आहेत. त्यात अल्का बडे (रा. जाटवाद, ता. शिरुर), शिलावती दिंडे (रा. मंगळूर, ता. आष्टी) व शिलाबाई भोसले (रा. पारगाव, ता. आष्टी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर अशोक आवटे, कृष्णा आवटे (रा. आपेगाव, गोदावरी नदीकाठी उत्तरेस), छबुबाई राठोड (रा. भगवानगड तांडा, ता. पाथर्डी), नागनाथ गर्जे (रा. सुर्डी, ता. आष्टी), स्वराज भापकर (रा. किन्ही, ता. आष्टी), सुरेखा भोसले (रा. रा. पारगाव, ता. आष्टी), कल्याण फुंदे (रा. लिंबेवाडी, ता. करमाळा), जयश्री शिंदे (रा. अंजनडोह, ता. करमाळा)व फुलाबाई हरिचंद कोठले (उसतोड कामगाराची मुलगी) यांचा बिबट्याने बळी घेतला आहे. दरम्यान, बिबट्याला ठार करण्यासाठी पुणे व औरंगाबाद प्रादेशिक वन विभागीय कार्यालयाने प्राधिकृत केलेले वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी तथा अन्य व्यक्‍तींनाच परवानगी असेल, असेही श्री. काकोडकर यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT