मोहोळ : कोरोना ने मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना 50 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केली आहे, ती मदत कशी मिळवावी, त्या बाबतचा मागणी फॉर्म कसा भरावा यासाठी मोहोळ येथील तहसील कार्यालयात तीन दिवशीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. त्यामुळे कोरोना ने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Tehsildar Prashant Bedse informed that a three day orientation camp was organized at the tehsil office)
गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण देशातच कोरोना ने आणि थैमान घातले आहे. अनेकांचे यात मृत्यू झाले, अनेकांचे संसार उघड्यावर पडले, तर काही जणांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे सर्व सामान्य जनता हतबल झाली. जनतेची होत असलेली परवड लक्षात घेऊन मृताच्या वारसाला 50 हजार रुपये मदत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जेणे करून त्यांना आधार मिळावा हा त्यामागचा हेतू आहे.(Government decides to provide Rs. 50,000 to the corona deceased)
मोहोळ तालुक्यात कोरोना ने 437 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना सुमारे दोन कोटी 18 लाख 50 हजार रुपयाची मदत मिळणे अपेक्षीत आहे. मात्र सदरची मदत मिळविण्या साठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, मदत मागणी अर्ज कसा भरावा, याची ग्रामीण जनतेला माहिती नसते. त्यामुळे फॉर्म भरून ही त्यातील त्रुटी मुळे ते बाद होतात,परिणामी वारसाचा वेळ व पैसा वाया जातो. या पार्श्वभूमीवर मदत मिळविण्यासाठी तहसील कार्यालयातच ता. 25 ते 27 डिसेंबर या तीन दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामुळे मृताच्या वारसाला मोठा दिलासा मिळणार आहे. मदत मागणी चा फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराने स्वतःचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, मृत व्यक्ती कोणत्या कारणाने मृत झाली त्याच्या नोंदीचा वैद्यकीय अहवाल, निकटच्या नातेवाईकाचे ना हरकत प्रमाणपत्र, कोरोना पॉझिटिव असल्याचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे घेऊन येण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले आहे.(Mohol taluka, 437 people have died due to corona)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.