खासदार ओमराजे निंबाळकर Sakal
सोलापूर

उस्मानाबादच्या खासदारांनी गाजवली सोलापूरची नियोजन बैठक!

उस्मानाबादच्या खासदारांनी गाजवली सोलापूरची नियोजन बैठक!

अरविंद मोटे

आपल्या मुद्देसूद मांडणीने उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोलापूरच्या नियोजन समितीची बैठक चांगलीच गाजवली.

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी झाली. बार्शी (Barshi) तालुका उस्मानाबाद (Osmanabad) लोकसभा मतदारसंघात असल्याने या बैठकीला उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) हेही उपस्थित होते. आपल्या मुद्देसूद मांडणीने त्यांनी सोलापूरच्या (Solapur) नियोजन समितीची बैठक चांगलीच गाजवली. बार्शी तालुक्‍यातील पीककर्ज वाटपाचा मुद्दा असो की पंचनाम्याचा मुद्दा असो, त्यांनी आपले म्हणणे अभ्यासपूर्ण मांडले. अतिरिक्‍त पावसाची नोंद होऊन केवळ 24 तासांत 65 मिलिमीटर पावसाची नोंद होण्याच्या नियमावर बोट ठेवत बार्शी तालुक्‍यातील पंचनामे नाकारणाऱ्या महसूल विभागाची त्यांनी झाडाझडती घेतली. तसेच पीककर्ज वाटपात उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या राष्ट्रीयकृत बॅंकांनाही त्यांनी धारेवर धरले. वीजबिलाच्या प्रश्‍नावरील चर्चेतही त्यांनी समर्पकपणे भाग घेतला.

सोमवारच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत अभ्यासपूर्ण व मुद्देसूद मांडणी करणारे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामुळे तातडीने पालकमंत्र्यांनी पूर व पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या नोंदी बाधित क्षेत्र म्हणून करून घेण्याचे आदेश दिले. दुर्दैवाने अतिवृष्टीच्या मदतीबाबत निघालेल्या शासन आदेशात सोलापूर जिल्हा वगळला गेला आहे. उस्मानाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे, मात्र सोलापूर जिल्ह्याचा नाही. याचे कारण सोलापूरचे लोकप्रतिनिधीच आहे. ज्या पोटतिडकीने ओमराजे निंबाळकर पालकमंत्र्यांसमोर बार्शी तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी पीककर्ज व नुकसान भरपाईचे मुद्दे मांडत होते, त्या पोटतिडकीने जिल्ह्यातील ढीगभर सत्ताधारी, विरोधी आणि अपक्ष लोकप्रतिनिधींनी मांडले नाहीत.

अतिवृष्टीसाठी शासनाने 24 तासात 65 मिलिमीटर पावसाची नोंद होण्याची अट घातली आहे. बार्शी तालुक्‍यातील काही महसूल मंडळांत 24 तासात 65 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र, काही ठिकाणी 24 तासात 65 मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असली तरी सलग दोन- तीन दिवस सुमारे 50 ते 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी पाऊस कमी असला तरी पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी दोन्ही प्रकारे बाधित झालेल्या नुकसानीची नोंद महसूल विभागाने घ्यावी, अशी आग्रही मागणी ओमराजे निबांळकर यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. तसेच बार्शी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना बॅंकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा अत्यंत पोडतिडकीने मांडला.

तालुक्‍यातील बॅंकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट किती आहे व किती टक्के उद्दिष्ट साध्य केले, असा प्रश्‍न त्यांनी मांडला. एलडीएम कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याचे उत्तर देता आले नाही. पीक कर्जवाटपात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत तसेच ज्या महसूल मंडळात 24 तासात 65 मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे मात्र नुकसान झाले आहे, त्यांनाही मदत मिळावी, या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

तर इतर तालुक्‍यांनाही न्याय मिळाला असता...

जो प्रश्‍न बार्शी तालुक्‍यात आहे तोच मुद्दा मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूरसह अक्कलकोट या तालुक्‍यातही आहे. मात्र, या तालुक्‍यांतील एकाही लोकप्रतिनिधीने नुकसान भरपाईचा प्रश्न पालकमंत्र्यांसमोर मांडला नाही. जर मांडला असता तर कदाचित नवीन आदेशात अतिवृष्टीसाठी बाधित क्षेत्र म्हणून सोलापूर जिल्ह्याचाही समावेश झाला असता. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीइतकेच नुकसान इतर भागात झाले आहे. मात्र, यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा लावून धरला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT