Solapur News Sakal
सोलापूर

Solapur News : दोन दिवसांत ५२ लाखांपेक्षा जास्त वसुली; महापालिकेच्या नऊ पथकांची कारवाई; ५७ नळ बंद

दोन दिवसांत ५२ लाख ५८ हजार १४४ रुपये थकबाकी वसुली करण्यात आली आहे. तर धडक कारवाई करताना सोमवारी २४ तर मंगळवारी ३३, असे एकूण ५७ नळ दोन दिवसांत बंद करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीपोटी प्रशासनाने नेमलेल्या नऊ पथकांनी सोमवारी १५ लाख १२ हजार २२३ रुपये व मंगळवारी १३ लाख ८९ हजार ९२ रुपये, अशी तर मंगळवारी विविध कर संकलन केंद्र व ऑनलाइन याद्वारे २३ लाख ५६ हजार ८२९ रुपये वसुली केली.

दोन दिवसांत ५२ लाख ५८ हजार १४४ रुपये थकबाकी वसुली करण्यात आली आहे. तर धडक कारवाई करताना सोमवारी २४ तर मंगळवारी ३३, असे एकूण ५७ नळ दोन दिवसांत बंद करण्यात आले.

महापालिका मालमत्ता कर विभागातील कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध नऊ पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या मालमत्ता कराची ४०० कोटींहून अधिकची थकबाकी असून मार्च अखेरपर्यंत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट या विभागाला देण्यात आले आहे.

मंगळवारी केलेली वसुली व कारवाई

  • पथक एक - चार नळ बंद, चार लाख ८१ हजार १७० वसूल

  • पथक दोन - १० नळ बंद, वसुली नाही

  • पथक तीन - ० नळ बंद, दोन लाख ५० हजार १८० वसूल

  • पथक चार - चार नळ बंद, १५ हजार वसूल

  • पथक पाच - एक नळ बंद, एक लाख रुपये वसूल

  • पथक सहा - दोन नळ बंद, ७६ हजार ८५६ रुपये वसूल

  • पथक सात - सहा नळ बंद, तीन लाख ४२ हजार रुपये वसूल

  • पथक आठ - ० नळ बंद, ९३ हजार ८७८ रुपये वसूल

  • पथक नऊ - सहा नळ बंद, ३० हजार रुपये वसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT