मंगळवेढा : उत्तर प्रदेशातून येऊन योगी आदित्यनाथ बटेंगे तो कंटेंगेची घोषणा देतात, त्यांचा अर्धा उत्तर प्रदेश महाराष्ट्रात रोजगारासाठी येतो. भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न देशात अकराव्या क्रमांकावर घसरले आणि गुजरातचे वाढले.
महाराष्ट्रातील उद्योग नेऊन गुजरात श्रीमंत केला जातोय. उद्या नाशिक जिल्ह्यातील नद्यांचे पाणीसुद्धा गुजरातला नेले जाईल. देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाईमुळे शेतकरी संतप्त आहे. मात्र भाजप फक्त जातिधर्मांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात बटेंगे तो कंटेंगे नाही तर पढेंगे तो बढेंगे या धोरणाची गरज असल्याचे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले.
पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत आमदार जयंत पाटील बोलत होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, उमेदवार अनिल सावंत, प्रा. लक्ष्मण ढोबळे, वसंतराव देशमुख, डॉ. श्रीमंत कोकाटे, सुवर्णा शिवपूजे, सुभाष भोसले, अमर सूर्यवंशी, पूनम अभंगराव, राजश्री ताड, वृषाली इंगळे, साधना राऊत, चारुशीला कुलकर्णी, अनिता पवार, सुनंदा उमाटे, रेखा ताई, काजल भोरकडे, राहुल शहा, चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंदवे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उमेदवार अनिल सावंत यांनी, पक्षाने उमेदवार देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी सार्थक करून दाखवणार आहे. एक परिचारकांच्या जिवावर आमदार झालेली व्यक्ती आहे तर दुसरे आपल्या सहकारी पक्षातले उमेदवार हे नेहमी नॉट रिचेबल असतात.
या मतदारसंघात विद्यमान आमदार सांगतात की तीन हजार कोटींची कामे केली, मात्र ते केवळ मोठमोठे आकडे सांगतात. त्यांची कामे फक्त कागदावर आहेत.
मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न आम्हीच सोडवणार
जयंत पाटील म्हणाले, अनिल सावंत यांनाच शरद पवारांचे आशीर्वाद आहेत, हे विसरू नका. पवारांच्या निर्णयाची वाट न बघणाऱ्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवा. आमच्या सरकारने अडीच वर्षांच्या काळात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा पाणी कोटा एक टीएमसीवरून दोन टीएमसी केला.
म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्नही आम्ही सोडविणार आहोत. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आमचेच सरकार सोडवणार आहे. समोर जरी काँग्रेसचा उमेदवार असला तरी ही मैत्रिपूर्ण लढत होईल.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.