harbhara vegetable sakal
सोलापूर

Pandharpur News : हरभऱ्याच्या भाजीला मिळतोय चिकन पेक्षा जास्त भाव

पंढरीतील नवी पेठ परिसरात भरणाऱ्या भाजी बाजारामध्ये हरभऱ्याची भाजीची सध्या ५० ते ६० रुपये पाव किलो म्हणजे २०० ते २४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

राजकुमार घाडगे

पंढरपूर - पंढरीतील नवी पेठ परिसरात भरणाऱ्या भाजी बाजारामध्ये हरभऱ्याची भाजीची सध्या ५० ते ६० रुपये पाव किलो म्हणजे २०० ते २४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर सध्या ब्रॉयलर चिकनचा दर २०० रुपये किलो आहे. एकंदरीतच दरांची तुलना केली असता हरभऱ्याची भाजी मात्र चिकन पेक्षा ही 'जास्त भाव खात' आहे.

हिवाळाच्या हंगामामध्ये बहुतांश शेतकरी हरभऱ्याची लागवड करतात. कडाक्याची थंडीमुळे पहाटे हरभऱ्याच्या पानांवर आंब पडली की मग भाजीसाठी हरभर्‍याचे कोवळे शेंडे खुडले जातात. ही खुडलेली हरभऱ्याची भाजी ग्रामीण भागातील काही शेतकरी महिला नवी पेठ परिसरातील भाजी बाजारामध्ये विक्रीला घेऊन येत आहेत.

फक्त थंडीच्या दिवसांत मिळणाऱ्या व भरपूर जीवनसत्व आणि पोषणमूल्य असलेल्या या भाजीला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. या भाजीची आवक कमी व मागणी जास्त असल्यामुळे या भाजीला इतर भाज्यांपेक्षा सर्वाधिक भाव मिळतो. सध्या हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची ही भाजी ५० ते ६० रुपये पाव किलो या दराने विक्री होत आहे.

इतर सर्व पालेभाज्या दहा ते पंधरा रुपये प्रति पेंडी या दराने विकल्या जात असताना हरभऱ्याची भाजी मात्र २०० ते २४० रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. तर ब्रॉयलर चिकन सध्या २०० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होत आहे. एकंदरीतच दराची तुलना केली असता चिकन पेक्षाही हरभऱ्याची भाजी जास्त भाव खात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हरभराच्या भाजीवर आंब पडत असल्याने भाजी खुडताना हाताची बोटे काळी पडतात. जरा जास्त वेळ भाजी खुडली तर हाताच्या बोटांना भेगा ही पडतात. तरी देखील इतर भाज्यांपेक्षा हरभऱ्याच्या भाजीला चांगला भाव मिळत असल्यामुळे आमच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते.

- सुदामती अंबादास जमदाडे, रा. चिलाईवाडी, ता. पंढरपूर

हरभऱ्याची भाजी पौष्टिक असल्यामुळे आरोग्यास लाभदायक आहे. या भाजीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे अनेक पोषक घटक आहेत, ज्यामुळे बद्धकोष्ठता, मधुमेह यांसारखे शरीराचे अनेक आजार कमी होतात. फक्त थंडीच्या हंगामात मिळणारी ही भाजी प्रत्येकाने आवर्जून खायला हवी.

- डॉ. संभाजी भोसले, आयुर्वेदाचार्य, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिझ्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT