Pandharpur-Mangalveda sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : चौरंगी लढतीत मैत्रीपूर्ण बंडाने चुरस

Pandharpur-Mangalveda Vidhan Sabha Election 2024 : यंदा महाविकास आघाडीत बिघाडी होत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि कॉंग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. महाविकास आघाडीत दोघांकडूनही जोर; मनसेने आणली रंगत ,

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : शरद पवार यांच्या विचारांचा अशी मतदारसंघाची असलेली ओळख, गत पोटनिवडणुकीत भाजपने पुसली असली तरी यंदा महाविकास आघाडीत बिघाडी होत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि कॉंग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे.

यामध्ये अनिल सावंत आणि भगीरथ भालके आमनेसामने आहेत. भाजपच्या आमदार समाधान आवताडेंसाठी परिचारक यावेळीही प्रचारात आहेत. यामध्ये मनसेच्या दिलीप धोत्रे यांनी चुरस निर्माण केली असून, चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडेच लक्ष लागले आहे.

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनीही जोर लावला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. भाजप उमेदवार समाधन आवताडे यांच्या समोर महाविकास आघाडी आणि मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला गड कायम राखला आहे. यावेळी प्रशांत परिचारक निवडणूक लढवतील अशी शक्यता होती, पण त्यांनी ऐनवेळी माघार घेत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला.

मराठा आरक्षण, शेतीमालाचे पडलेले भाव, बेरोजगारी, सिंचनाच्या रखडलेल्या योजना या मुद्द्यांवर निवडणूक आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने हाती संधी जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वैयक्तिक गाठीभेटी, पदयात्रा काढून सर्वांनीच मतदारांशी संपर्क वाढवला आहे. मनसेचे धोत्रे यांनी प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढवली आहे.

गेल्या तीन वर्षांत आमदार समाधान आवताडे यांना मंगळवेढा तालुक्यातील शेतीचा पाणी प्रश्न सोडवण्यात यश‌ आले आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र खासदार प्रणिती शिंदे यांना ४२ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने भाजप आमदार समाधान आवताडे यांची धाकधूक वाढली आहे. एकूणच यंदा पंढरपुरात भाजप उमेदवार समाधान आवताडे, कॉंग्रेस उमेदवार भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्यासह मनसेचे दिलीप धोत्रे यांच्यात चुरशीने लढत होणार आहे. चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडेच लक्ष लागले आहे.

फोडाफोडीच्या राजकारणाला वेग

निवडणूक प्रचाराचा ज्वर वाढू लागला आहे. तसा फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना पंढरपूर शहरातील प्रताप गंगेकर, बाळासाहेब नेहतराव, सुरेश नेहतराव यांच्यासह सहा माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. तर भालके गटाच्या माजी नगराध्यक्ष उज्वला भालेराव यांच्यासह माजी नगरसेवक महादेव धोत्रे यांनी भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला आहे. मंगळवेढा येथील जिल्हा बॅंकेचे माजी संचालक बबन आवताडे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय अनेक छोटेमोठे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सर्वच प्रमुख उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या फोडाफोडीचा कोणाला किती फायदा होणार हे पाहावे लागेल.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT