पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर व परिसराला गुरुवारी (ता. 30) मध्यरात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. एकाच रात्रीत पंढरपूर शहरात विक्रमी 75 मिलिमीटर इतरक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षांतील ही उच्चांकी पावसाची नोंद मानली जात आहे. तर तालुक्यात एकूण एकाच रात्रीत सरासरी 30 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
हेही वाचा : तो आला, त्यानं पाहिलं अन् तिघांना आपलंसं केलं..! "या' ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
यावर्षी जून-जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. बुधवारी दिवसभर कडक ऊन असल्याने उकाडा वाढला होता. रात्री उशिरापर्यंत पावसाची चिन्हे दिसत नव्हती. अचनाक रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. गुरुवारी (ता. 30) पहाटे तीन वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. पंढरपूर शहरात उच्चांकी सर्वाधिक 75 मिलिमीटर इतका पाऊस झाला. हा पाऊस गेल्या दहा वर्षांतील एका दिवसातील उच्चांकी पाऊस असल्याचे अनेक जुन्या जाणत्या लोकांनी सांगितले. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांची झोप उडाली होती. अनेकांनी मध्यरात्री उठून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचे रूप पाहिले. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. तर शहरातील सर्वच रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. सकाळपर्यंत रस्त्यावरून पाणी वाहत होते.
शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस झाला.
हेही वाचा : लॉकडाउनचा झटका..! विडी उद्योगाला "इतक्या' कोटींचा फटका; कामगारांचे 80 कोटी तर सरकारचेही 42 कोटींचे नुकसान
जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील ओढे, नाले, तलाव भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे कासाळ ओढा दुथडी भरून वाहू लागला आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे सुपली-पळशी येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या दोन गावांना जोडणारा मार्ग दुपारपर्यंत बंद होता. नारायण चिंचोली येथील ओढ्याला पाणी आल्यामुळे येथील पूल पाण्याखाली गेला होता. अनेक पिकांत पाणी साचले आहे. त्यामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. पंढरपूर शहरापाठोपाठ तुंगत मंडलामध्ये सर्वाधिक 32 मिलिमीटर पाऊस झाला आहे. भंडिशेगाव मंडलातही 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वांत कमी करकंब मंडलात फक्त 15 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आजअखेर तालुक्यात सरासरी 323.22 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तिप्पट पाऊस झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पुनर्वसू नक्षत्रात झालेला हा मुसळधार पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरला आहे. तर आडसाली उसालाही मोठा फायदा झाला आहे. तोडणीसाठी आलेल्या ऊसवाढीस देखील हा पाऊस फायद्याचा ठरला आहे. समाधानकारक होत असलेल्या पावसामुळे यावर्षी बळिराजा सुखावला आहे.
मंडलनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
करकंब - 15, पटवर्धन कुरोली - 31, भंडिशेगाव - 30, भाळवणी - 25, कासेगाव - 28, पंढरपूर - 75, तुंगत - 32, चळे - 24, पुळूज - 17
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.