Pandharpur Temple sakal
सोलापूर

Pandharpur News : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील व्यवसाय ठप्प

पदस्पर्श दर्शन बंदमुळे भाविकांच्या संख्येत मोठी घट; पंढरपूरच्या अर्थकारणाला फटका

राजकुमार घाडगे

पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे जीर्णोद्धार व संवर्धनाचे काम सुरू असल्याने, मागील १५ मार्चपासून श्री विठ्ठल- रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. पदस्पर्श दर्शन बंद असल्याने श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. परिणामी मंदिर परिसरातील विविध व्यवसाय ठप्प झाले असून, त्याचा परिणाम थेट अर्थकारणावर झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निधीतून पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या संवर्धनाचे व जीर्णोद्धाराचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. मंदिर संवर्धनाच्या कामासाठी मागील १५ मार्चपासून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले असून, पहाटे पाच ते सकाळी ११ या वेळेत केवळ मुखदर्शन सुरू आहे. त्यामुळे भाविकांची संख्या कमालीची रोडावली आहे.

त्याचा थेट परिणाम प्रासादिक वस्तू, उदबत्ती, चुरमुरे, बत्तासे, तुळशीहार, फुले, पेढा, मेवा मिठाई यासह इतर साहित्य विक्री करणाऱ्या छोट्या- मोठ्या दुकानदारांच्या व्यवसायावर झाला आहे. श्री विठ्ठल दर्शनासाठी दररोज येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर व आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार प्रमुख यात्रांवर पंढरपूरचे अर्थकारण अवलंबून आहे.

कोरोनानंतर दररोज सुमारे ३० ते ४० हजार भाविकांची पंढरीत गर्दी होत आहे. या भाविकांमुळेच पंढरीतील प्रासादिक वस्तूंची विक्री करणारे छोटे- मोठे व्यावसायिक व लॉज, हॉटेल व्यवसायात मोठी उलाढाल होते. तर टांगेवाले, रिक्षावाले, हारफुलांची विक्री करणारे, पेरू विक्रेते, चंद्रभागा नदीमध्ये होडी चालवणारे कोळी बांधव यांना रोजगार उपलब्ध होतो.

मात्र मागील पंधरा दिवसांपासून या रोजगाराला जबर फटका बसला आहे. मंदिर परिसरातील सुमारे अडीचशे ते तीनशे छोट्या- मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. अजून किमान एक महिना तरी पदस्पर्श दर्शन बंद राहणार असल्याने या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आम्ही मंदिर परिसरामध्ये तुळशीहार व फुलांची विक्री करतो. मागील काही दिवसांपासून दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या घटली आहे. त्यामुळे आमचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- दिनेश देवमारे, तुळशीहार विक्रेता पंढरपूर

माघी यात्रेला चंद्रभागा नदीमध्ये पाणी नव्हते. सध्या नदीपात्रात मुबलक पाणी असले तरी भाविकच नसल्याने आमचा होडी व्यवसाय बंद आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- भागवत करकमकर, होडीचालक, पंढरपूर

आमचा प्रासादिक साहित्य व नारळ विक्रीचा व्यवसाय आहे. पदस्पर्श दर्शन बंद असल्याने भाविकच येत नसल्याने आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

- सुमीत शिंदे, प्रासादिक वस्तू विक्रेते, पंढरपूर

मी मंदिर परिसरामध्ये दररोज सरासरी शंभर किलो पेरू विक्री करत होतो. सध्या जेमतेम २० ते ३० किलो पेरू विक्री होत आहे. त्यातून रोजचा खर्चही भागत नाही.

- सूरज गंगथडे, पेरू विक्रेता, पंढरपूर

भाविकांची संख्या सध्या कमी झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र मंदिर संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल व चांगला व्यवसाय होईल, अशी अपेक्षा आहे.

- सागर ताठे-देशमुख, ताठे अगरबत्ती, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

Beed News : मुंडेंच्या जिल्ह्यात लक्ष्मण हाकेंच्या शब्दालाही मान

IND vs AUS : लपक-झपक... Dhruv Jurel चा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियन फलंदाजही स्तब्ध, Video viral

IPL 2025 Auction Live: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई-मुंबईमध्ये चढाओढ! कोण आहे Anshul Kamboj?

SCROLL FOR NEXT