past 11 month 81 boys and girls missing need councelling solapur crime update marathi news Sakal
सोलापूर

Solapur News : अकरा महिन्यांत ८१ अल्पवयीन मुले बेपत्ता; 3 वर्षांत बेपत्ताचे प्रमाण अधिक, योग्य समुदेशनाची आवश्‍यकता

घर सोडून निघून जाण्याच्या मुला-मुलींच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी त्यांना समूदेशनाची आवश्‍यकता

सकाळ वृत्तसेवा

- अप्पासाहेब हत्ताळे

Solapur News: आईवडिलांचे भांडण, हलाखीची आर्थिक स्थिती, अभ्यासाचा ताण व वाढत्या अपेक्षेतून पालकांचे रागावणे यामुळे सोलापूर शहरातून ११ महिन्यांत ८१ अल्पवयीन मुला - मुलींनी घर सोडले. गतवर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी कमी असली तरी गेल्या तीन वर्षांत मुलांच्या बेपत्ता होणे अथवा घर सोडण्याचे प्रकार वाढले आहेत.

तथापि, घर सोडून निघून जाण्याच्या मुला-मुलींच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी त्यांना समूदेशनाची आवश्‍यकता आहे. नोकरी किंवा गरिबीमुळे कामातील व्यस्ततेमुळे पालक किशोरवयीन मुला-मुलींशी संवाद साधू शकत नाहीत.

त्यांच्या भावभावना जाणून घेऊन संवाद साधायला जवळचे कोणी नसल्याने मुले मोबाइलकडे वळत आहेत. त्याचा वाढता वापर मुलांच्या असुरक्षिततेचे कारण ठरत आहे. तसेच प्रेमसंबंध व कामासाठी सोशल मीडियातील मैत्रीतूनही मुला- मुलींचे घर सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.

विशेष म्हणजे बहुतांश पालक पाल्यांच्या मित्र - मैत्रिणींविषयी अनभिज्ञ असतात, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी गेल्या ११ महिन्यांत ७२ मुला - मुलींची घरवापसी केले आहे.

  • अभियांत्रिकी महाविद्यालयात महाविद्यालयात शिकत होता. अभ्यासाचा ताण होता. आईवडिलांच्या अपेक्षांमुळे त्यात भर पडत होती. त्यामुळे वैतागून पळून गेला.

  • घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कामासाठी आधी बंगळूरला गेला. अल्पवयीन असल्याने तेथे काम नाकारले गेले. त्यामुळे नंतर पुणे, मुंबई गाठले.

  • आईवडिलांचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे व्हायची. परिणामी ते विभक्त झाले. आईशी न पटल्याने तो वडिलांकडे निघून गेला.

  • तिचे एका मुलावर प्रेम होते. आईवडिलांनी दुसरीकडे लग्न ठरविले. त्यामुळे कोणाला न सांगता पसंतीच्या मुलासोबत पळून गेली.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधीक बेपत्ता

मागच्या ११ महिन्यांत एमआडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक मुले - मुली बेपत्ता झाली आहेत. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेला कामगार वर्ग, गरीबी, अशिक्षितता, त्यामुळे पाल्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मुले - मुली घर सोडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात आले.

बेपत्ता मुलांचा तपास करताना पालकांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींबाबत माहिती नसल्याचे दिसते. पालकांनी त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, याबाबत जागरूक असावे. ते मोबाइलच्या आहारी जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यांची मानसिकता, गरज ओळखावी. त्यांना आपल्या कुवतीनुसार काय देऊ शकतो, काय नाही, हे आधीपासूनच त्यांना सांगायला हवे.

- प्रांजली सोनवणे, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर

मुलांचे घरातून पळून जाण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधून त्यांचा कल जाणून त्यादृष्टीने लक्ष ठेवणे शक्य आहे. घरातील भांडणाचे विषय मुलांसमोर येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच पालकांनी मुलांच्या कुवतीनुसार अपेक्षा ठेवणे गरजेचे आहे.

- मोहन बनसोडे, समाजसेवा अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT