Gharkul Crime 
सोलापूर

धक्कादायक ! आईचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह का दिला म्हणत आरोग्य सेविकांवर रुग्णाच्या मुलाचा हल्ला !

विश्वभूषण लिमये

सोलापूर : येथील विडी घरकुल आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांवर गोरख विटकर या इसमाने हल्ला केला आहे. आपल्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह का दिला? याचा जाब विचारण्यासाठी त्याने आरोग्य केंद्रामध्ये धिंगाणाही घातला. ही घटना गुरुवारी (ता. 25) घडली. 

दरम्यान, रुग्णसेविकांनी गोरख विटकर या इसमाने बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर गोरख विटकर याने आरोग्य केंद्रामध्ये लोखंडी बाकडे फेकून मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. 

आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या एक्‍स - रे टेक्‍निशिअनचे कपडे फाडण्याचा प्रयत्न सुद्धा गोरख विटकर याने केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. संबंधित आरोग्य सेविकांना पोलिस कॉन्स्टेबलचं संरक्षण आहे, मात्र पोलिसांच्या समोरच गोरख विटकर याने हा धिंगाणा केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही आता प्रश्न उपस्थित होत आहे. 

हा संपूर्ण धिंगाणा गोरख विटकर या तरुणाने मद्य प्रशान करून केल्याचंही समोर आलं आहे. या घटनेची तक्रार पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे आरोग्य सेविकांनी केल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गोरख विटकर याच्यावर गुरुवारी रात्री उशिरा सरकारी कामामध्ये अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती. 

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही स्वतःचा जीव धोक्‍यात घालून आरोग्य सेवक कोरोना काळामध्ये स्वतःची जबाबदारी पार पाडत असताना, रुग्णांच्या नातेवाइकांकडून आरोग्य सेवकांना दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे महिला आरोग्य सेविकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कालच्या विडी घरकुल आरोग्य केंद्रातील या घटनेमुळे तर खळबळ उडाली असून, अशा हीन प्रवृत्तीच्या लोकांपासून आरोग्य सेवकांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT