बहुतेक अवजड वाहने दुभाजकाच्या बाजूने चालतात आणि त्यामुळे हलकी वाहने डाव्या बाजूने जात असल्याने अपघात वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
सोलापूर : बहुतेक अवजड वाहने दुभाजकाच्या बाजूने (उजवी बाजू) चालतात आणि त्यामुळे हलकी वाहने डाव्या बाजूने जात असल्याने अपघात (Accident) वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे (आरटीओ) (Sub-Regional Transport Officer Sanjay Dole) यांनी हाती घेतली आहे. महामार्गाच्या डाव्या बाजूने अवजड वाहन चालविणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी विशेष नियम आहेत. अवजड वाहनांनी कोणत्या बाजूने जावे, हलकी वाहने कोणत्या लेनमधून जाऊ शकतात, याचेही नियम ठरले आहेत. तरीही, रस्त्यालगत वाहने थांबविणे, बंद पडलेली वाहने रस्त्यावर तशीच असतात, वाहने थांबल्यानंतर त्याठिकाणी लावलेले दगड काढले जात नाहीत. सीटबेल्ट न लावता वाहन चालविणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे असे प्रकार सुरूच आहेत. सोलापूर - पुणे, सोलापूर - तुळजापूर, सोलापूर - विजयपूर, सोलापूर - अक्कलकोट, सोलापूर - हैदराबाद या महामार्गांची कामे झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला असून अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरटीओने कारवाई कडक केली आहे. नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार असून, वेळप्रसंगी संबंधित वाहनाचा व वाहनचालकाचा परवानाही निलंबित केला जाणार आहे, अशी माहिती डोळे यांनी दिली. दरम्यान, लेन कटिंग करणाऱ्या अवजड वाहनांवर नजर ठेवण्यासाठी महामार्गांवर आरटीओ अधिकारी असतील, असेही ते म्हणाले.
नियम मोडल्यास "असा' आहे दंड
लेन कटिंग : 1,200
हेल्मेट नाही : 500
विमा नाही : 2,300
पीयूसी नाही : 1000
सीटबेल्ट नाही : 1000
मोबाईल टॉकिंग : 1000
परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात रोखण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना शिस्त लावण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. ऑगस्टमध्ये जवळपास 47 लाखांचा दंड वसूल केला आहे.
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
...तर तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित
मोबाईलवर बोलत वाहन चालविणे गुन्हा असून त्यातून अपघाताला निमंत्रण मिळते. अशा बेशिस्त वाहनचालकाला एक हजारांचा दंड केला जातो. वेळप्रसंगी त्याचा वाहन चालविण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबितदेखील केला जातो. महामार्गावरून प्रवास करताना दुचाकीस्वारांकडे हेल्मेट असणे बंधनकारक आहे. तरीही, अनेकांकडे हेल्मेट दिसत नाही. आता त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे; जेणेकरून अपघात कमी व्हावेत, असा त्यामागील उद्देश आहे, असेही डोळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.