Pili dance artists from Kerala attracted attention Gaibipir procession solapur sakal
सोलापूर

Pili Dance : केरळ येथील कलाकारांच्या पिली नृत्याने वेधले लक्ष

सर्वधर्मीय भाविकांच्या उपस्थितीत मंगळवेढा येथील गैबीपीर कळसारोहण मिरवणूक उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा : शहरातील हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या गैबीपीरच्या कळसारोहण मिरवणुकीत केरळच्या कलाकारांनी सादर केलेल्या पिली नृत्याने मंगळवेढेकरांचे लक्ष वेधून घेतले.

बोराळे नाका येथून कळसाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या हस्ते कळसाचे पूजन करण्यात आले. जकराया शुगरचे अध्यक्ष अॅड. बिराप्पा जाधव अध्यक्षस्थानी होते.

यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उरुस कमिटीचे सरपंच प्रशांत गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष उमेश सूर्यवंशी, मानकरी अनिल पाटील, गौस मुजावर, आनंद माळी, अतिष लांडे, सागर पडवळे, आदिल मुल्ला, अक्रम मुल्ला, संतोष माळी, मनोज माळी, शरद गोडसे, आशिष माळी यांच्यासह सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मिरवणुकीसाठी किल्ले मच्छिंद्रगड (सांगली), अथणी (बेळगाव) येथील नामवंत बँड व कोल्हापूर येथील शोचे आयोजन करण्यात आले. त्यामधून अनेक प्रबोधनात्मक संदेश देण्यात आले. याशिवाय केरळ येथील १६ कलाकारांचा सहभाग असलेल्या पिली नृत्याने मंगळवेढेकरांचे लक्ष वेधले.

सायंकाळी सुरू झालेली कळस मिरवणूक पहाटे दर्ग्यासमोर आल्यानंतर विधिवतपणे कळसारोहण करण्यात आले. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी उसळली होती. त्यानंतर सागर फायर वर्क्सतर्फे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. कळस मिरवणुकी दरम्यान अनेकांनी या कळसाला नारळाचे तोरण चढवून आपल्या नवसाची पूर्ती करण्याचा प्रयत्न केला.

उरुसाच्या निमित्ताने शहरामध्ये नारळाची उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर सलग दोन दिवस जंगी कव्वालीचा मुकाबला मंगळवेढेकरांना पाहावयास मिळाला. भाविकांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेली स्वागतकमान देखील लक्षवेधक होती. गेल्या दोन वर्षात उरुस कमिटीचे सरपंच प्रशांत गायकवाड यांनी वेगवेगळे उपक्रम राबवत सामाजिक समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

Latest Maharashtra News Updates : उबाठा उमेदवार भाजप कार्यालयात

SCROLL FOR NEXT