सोलापूर

सोने व्यापाऱ्याच्या सतर्कतेने दरोडेखोर गजाआड

राजकुमार शहा

ही घटना (ता.6) ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सौंदणे कट परिसरामध्ये घडली.

मोहोळ (सोलापूर): सोन्या-चांदीचे दुकान बंद करून सायंकाळी घराकडे परत येणाऱ्या पती-पत्नीची मोटारसायकल अडवली. आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये चटणी टाकून लोखंडी कोयत्याचा धाक दाखविला. त्यानंतर एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या टोळीला चोवीस तासाच्या आत पकडण्यात मोहोळ पोलिसांना यश आले. ही घटना (ता.6) ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सौंदणे कट परिसरामध्ये घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मोहोळ येथील सोन्या-चांदीचा व्यवसाय करणारे प्रकाश सदाशिव हंबीरे यांचे अंकोली गावांमध्ये सोन्या-चांदीचे दुकान आहे. या दुकानांमध्ये त्यांची पत्नी व ते दोघे दररोज मोहोळहून जातात. (ता.सहा) ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे सांयकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दुकान बंद करून मोहोळ कडे जात असताना दुकानातील सोन्या-चांदीचे एक लाख पाच हजार रुपयांचे दागिने आपल्या पर्समध्ये ठेवून ते दोघे मोटार सायकल वरून मोहोळ कडे येत असताना सौंदणे कट परिसरात पाठीमागून दोन मोटार सायकल वर पाच जणांनी येऊन मोटारसायकल आडवी लावून पत्नीच्या गळ्याला लोखंडी कोयता लावून दोघांच्या डोळ्यात व तोंडावर पुडीत आणलेली चटणी टाकून त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने असणाऱ्या पर्स हिसकावून घेऊन मोहोळ च्या दिशेने पसार झाले.

दरम्यान प्रकाश हंबीरे व त्यांच्या पत्नी यांनी जवळील असलेल्या पाण्याने तोंड धुतले. त्याच दरम्यान सव्वासातच्या वाजता सौंदणे कडे दोन मोटारसायकली पुन्हा माघारी जाताना दिसल्या. हंबीरे यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने सौंदणे परिसरातील लोकांना फोन करून आम्हाला लुटणारे दोन मोटरसायकल स्वार त्या दिशेने येत असल्याचे सांगितले. याचाच धागा पकडून सौंदणे परिसरातील दूध डेअरी वर असणाऱ्या नागरिकांनी सतर्कता दाखवत समोरून येणाऱ्या दोन सायकली पैकी एक मोटासायकल अडवून मोटरसायकल स्वारांना पकडले असता त्यांच्याजवळ लुटलेली पर्स निदर्शनास आल्याने पोलिस ठाण्याला फोन केला.

घटनेची माहिती मिळताच रात्री तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक आशुतोष चव्हाण यांच्यासह निलेश देशमुख, रवींद्र बाबर, मंगेश बोधले, हरीश थोरात, अमोल घोळवे, विकास हजारे, चालक चौधरी यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मोटरसायकल वरील सोनू शंकर बनसोडे रा.नारायण चिंचोली, (ता.पंढरपूर) उमेश चंद्रकांत रणदिवे रा.गिरवली (ता.इंदापूर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना शनिवारी मोहोळ येथील न्यायालयासमोर हजर केले असता 10 ऑगस्ट पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान या दरोड्याचे तपासी अधिकारी राजकुमार डुनगे यांनी सकाळी तपासाची सूत्रे हातात घेताच गतीने चक्रे फिरवीत या दरोड्यातील अन्य चार जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये किरण सज्जन गायकवाड, योगेश अशोक गायकवाड दोघेही रा.अंकोली ता. मोहोळ, अभिजीत विठ्ठल बंदपट्टे, मनोज बाळू वाघमारे दोघेही रा.पंढरपूर अशा चौघांचा समावेश असून या दरोडाप्रकरणी एकूण सहा जणांना ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुनगे हे करीत आहेत.

ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोहोळ पोलिस स्टेशनला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. फिर्यादी प्रकाश सदाशिव हंबीरे यांना भेटून घटनेची सविस्तर माहिती घेऊन अटक केलेल्या संशयित आरोपींकडून आणखी गुन्ह्याची उकल होते आहे का? याचा तपास करण्याचे आदेश त्यांनी तपास अधिकारी यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT