Possibility of Increase in Area under Kharif Cultivation in Solapur District Sakal
सोलापूर

Solapur News : यंदा खरिपाचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी विभागाचे नियोजन; ३० हजार ५०८ हेक्टरची वाढ शक्य

सकाळ डिजिटल टीम

Solapur Agriculture : सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र दोन लाख ८९ हजार ५७० हेक्टर आहे. गतवर्षी जिल्ह्यात तीन लाख ४६ हजार २१५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. मात्र, यंदा चांगला पाऊस पडण्याच्या शक्यतेने खरीपाच्या क्षेत्रात ३० हजार ५०८ हेक्टर क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता गृहित धरुन कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले आहे.

सोलापूर जिल्हा हा मुख्यतः रब्बीचा आहे. तर गेल्या अनेक वर्षांत खरीप बाजरी, भुईमूग, कापूस आदी पिकांचे क्षेत्र घटले आहे. त्याऐवजी सोयाबीन, तूर, उडीद, मका, भात आदी पिकांचे क्षेत्र वाढले आहे. या पिकामुळे पेरणी क्षेत्रातही वाढ झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात तीन लाख ४६ हजार २१५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. मात्र, यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे यंदा खरीपाच्या क्षेत्रात ३० हजार ५०८ हेक्टर क्षेत्रात वाढ होऊन ती तीन लाख ७६ हजार ७२३ हेक्टरवर पोचण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांत खरिपात झालेल्या पेरणीनुसार यंदा त्याच्या क्षेत्रात वाढ होईल, असे गृहित धरुन कृषी विभागाने नियोजन केले आहे.

घरचे सोयाबीन बियाणे मोहीम

गतवर्षी जिल्ह्यात एक लाख ३३ हजार २११ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा एक लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांत बार्शी, अक्कलकोट, उत्तर व दक्षिण सोलापुरात सोयाबीन पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ११ हजार ५०१ क्विंटल सोयाबीन बियाणांची विक्री झाली होती. ती गेल्या दोन वर्षांत १५ हजार ४६० क्विंटलपर्यंत वाढली. वाढते सोयाबीनचे क्षेत्र लक्षात घेता कृषी विभाग घरचे सोयाबीन बियाणे मोहीम राबवत आहे. त्या अंतर्गत १३ हजार ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.

या बीजोत्पादन उपक्रमात जिल्ह्यातील ७५२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून ८५ प्रात्यक्षिकांच्या बियाणांची चाचणी केली गेली आहे. यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यापूर्वी चांगला पाऊस झाला असताना झालेल्या खरीप पेरणीचा विचार करता यंदा त्यात वाढ होणार आहे.चांगला पाऊस झाल्यास खरीपही चांगला येईल. त्यामुळे खरिपाचे ३० हजार ५०८ हेक्टर क्षेत्र वाढेल, असे गृहित धरुन पेरणीचे नियोजन केले आहे, अशी माहिती दत्तात्रय गवसाने, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांनी दिली.

तालुकानिहाय प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • उत्तर सोलापूर - २६८३३

  • दक्षिण सोलापूर - ४२५९८

  • अक्कलकोट - १०१३९८

  • बार्शी - ६२७६३

  • मंगळवेढा - १८९६३

  • पंढरपूर -२२२५४

  • सांगोला -२७६०५

  • माळशिरस -५५४७

  • मोहोळ -३०१२२

  • माढा -१५९९७

  • करमाळा -२२६४१

  • एकूण ३७६७२३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT