Raksha Bandhan Postal department Sakal
सोलापूर

Post Office Raksha Bandhan Scheme : रक्षाबंधनासाठी पोस्टाची विशेष योजना...आता बारा रुपयांत वॉटरप्रूफ, आकर्षक राखी लिफाफे

सोलापूर टपाल विभागाने राखी पौर्णिमेनिमित्त केवळ १२ रुपयांत राखी लिफाफे उपलब्ध करून दिले आहेत. रक्षाबंधनसाठी ज्या बहिणीला भावाकडे अथवा भावाला बहिणीकडे प्रत्यक्ष जाता येत नाही, त्यांच्यासाठी विशेष राखी लिफाफ्याची सुविधा उपयुक्त आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर टपाल विभागाने राखी पौर्णिमेनिमित्त केवळ १२ रुपयांत राखी लिफाफे उपलब्ध करून दिले आहेत. रक्षाबंधनसाठी ज्या बहिणीला भावाकडे अथवा भावाला बहिणीकडे प्रत्यक्ष जाता येत नाही, त्यांच्यासाठी विशेष राखी लिफाफ्याची सुविधा उपयुक्त आहे.

हे लिफाफे वॉटरप्रूफ असून, भिजण्याचा धोका नाही. शिवाय विविध आकर्षक रंगातील लिफाफ्यांना डिंक लावण्याची गरज भासणार नाही. या प्रिगम (डिंक) युक्त लिफाफ्यावरील स्टिकर काढून ते चिकटविता येते.

अनेक भावा-बहिणींना एकमेकांकडे प्रत्यक्ष जाण्याची इच्छा असते. परंतु भाऊ घराचा आर्थिक भार उचलण्यासाठी मोठ्या शहरात, अन्य राज्यात नोकरी, व्यवसाय करतात तर अनेकजण सीमेवर राहून देशाचे रक्षण करतात. तर बहिणी घरी गावी असतात किंवा लग्नानंतर सासरी गेलेल्या असतात. अशा अनेक कारणांनी बहिणी भावाला भेटू शकत नाहीत.

त्यांच्यासाठी टपाल विभागाने हा विशेष उपक्रम राबविला आहे. आजच्या सोशल मीडिया व ई-मेलच्या काळात सर्वजण संदेश पाठवून अथवा व्हिडिओ कॉल करून रक्षाबंधन साजरा करतात. तरीही टपाल विभागाच्या लिफाफ्याचे महत्त्व टिकून आहे.

कारण भाऊ-बहीण प्रत्यक्ष भेटू शकत नसले तरी प्रत्यक्ष राखी देऊन रक्षाबंधन साजरे करण्याचा आनंद वेगळाच व तो द्विगुणित करणारा आहे. तसेच परंपरांना उजाळा देणारा ठरणार आहे. त्यामुळे गतवर्षीही सोलापूर विभागातून चार हजार लिफाफ्यांची विक्री झाली होती.

यंदाच्या राखी पौर्णिमेसाठी सोलापूर विभागात चार हजार ५०० वैशिष्ट्यपूर्ण राखी लिफाफे उपलब्ध आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही या लिफाफ्यांना विशेष मागणी आहे. ग्राहक त्यांच्या राखी स्पीड पोस्टानेही पाठवू शकतात.

त्यामुळे देशात आणि परदेशातही राखी अतिशय जलद व वेळवर पोहोचण्यासाठी टपाल विभागाने एक विशिष्ट व्यवस्था लावली आहे. लिफाफ्यावर लिहिलेल्या राखी या शब्दांमुळे त्यांचे वर्गीकरण सुलभ होणार आहे. त्यासाठी सोलापूर टपाल कार्यालयात पिन कोड नमूद केलेल्या पेट्या ठेवल्या आहेत.

त्यातील राखी पाकीट वेळेवर व सुरक्षितरित्या पोहोचविण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रत्येक पाकिटावर प्रेषकाचा व्यवस्थित पत्ता, पिन कोड आणि मोबाईल क्रमांक लिहून कार्यालयातील त्या संबंधित पेटीत लिफाफे ठेवावेत, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.

३०० रुपयांत लिफाफ्यावर फोटो

राखी पौर्णिमेनिमित्त भावाने बहिणीला किंवा बहिणीने भावाला भेट देण्यासाठी म्हणून टपाल विभागाने माय स्टॅम्प ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेतून नागरिकांना आपल्या प्रिय व्यक्तीचे पोस्टाचे तिकीट छापून घेता येणार आहे. त्यासाठी ३०० रुपये शुल्क आहे. डाक विभागाने छायाचित्र छापता येईल, अशाप्रकारची रचना लिफाफ्यावर केली आहे. कमी किमतीतील माय स्टॅम्प सुविधेमुळे रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित होणार आहे.

अशाप्रकारेही प्रेम व्यक्त करू शकता

माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण व मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी आधार लिंक असलेले टपाल विभागाचे बँक खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे राखीपौर्णिमेचे औचित्य साधून या दोन्ही योजनांसाठीचे बँक खाते उघडूनही आपले प्रेम व्यक्त करू शकता. त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.

रक्षाबंधनसाठी वैशिष्ट्यपूर्ण राखी लिफाफे उपलब्ध आहेत. बहिणींच्या राखी वेळेत व सुरक्षितपणे भावांपर्यंत पोहोचविण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. तशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. याचा लाभ घ्यावा.

- के. नरेंदर बाबू, प्रवर डाक अधीक्षक, डाकघर, सोलापूर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT