ahilyadevi-holkar solapur univercity sakal
सोलापूर

‘सिनेट’वरील सत्ता गुरुवारी ठरणार! मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीचा ’वॉच’

सिनेट निवडणूक गुरुवारी (ता. २९) होणार आहे. विविध मतदारसंघातील ३८ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी शहर-ग्रामीणमध्ये १६ केंद्रे असतील. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सिनेट निवडणूक गुरुवारी (ता. २९) होणार आहे. विविध मतदारसंघातील ३८ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी शहर-ग्रामीणमध्ये १६ केंद्रे असतील. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी ४ पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.

सिनेट निवडणुकीचा आज (बुधवारी) संपणार आहे. सोशल मिडियाचा आधार घेत अनेक उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे ‘सुटा’ व विद्यापीठ विकास मंच, संस्थाचालक मतदारसंघातील उमेदवार आणि वालचंद समूह व अपक्ष उमेदवारांनीही बहुतेक महाविद्यालयांना भेटी दिल्या. पदवीधर मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदानाचे आवाहन केले. ‘पदवीधर’मधून सिनेट सदस्य होण्यासाठी जवळपास एक हजार तर शिक्षक मतदारसंघातून विजयी होण्यासाठी साधारणत: १००-१२५ मते मिळवावी लागणार आहेत. शेवटच्या दिवशी काही उमेदवार पॅनलचा विचार सोडून स्वत:साठी प्रयत्न करतील, अशी चर्चा आहे. शिवसेनेत बंडखोरी होऊन शिंदे गट बाजूला झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड व युवासेना पहिल्यांदाच एकत्रितपणे ‘सुटा’कडून सिनेट निवडणूक लढवित आहेत. दुसरीकडे भाजपचा आधार घेऊन विद्यापीठ विकास मंच निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. उमेदवारांनी प्रचार जोरात केला, पण आता मतदारांची पसंती कोणाला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘सिनेट’साठी १६ मतदान केंद्रे

संगमेश्वर महाविद्यालय (सात रस्ता), दयानंद कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्स (रविवार पेठ), वालचंद कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्स (अशोक चौक), सी. बी. खेडगीज बसवेश्वर, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा जयसिंह आर्टस कॉलेज (अक्कलकोट), श्री शिवाजी महाविद्यालय (बार्शी), सौ. सुवर्णलता गांधी महाविद्यालय (वैराग), यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (करमाळा), शंकरराव मोहिते महाविद्यालय (अकलूज), संत दामाजी महाविद्यालय (मंगळवेढा), देशभक्त संभाजीराव गरड कॉलेज (मोहोळ), आर्टस ॲण्ड कॉमर्स कॉलेज (माढा), के. एन. भिसे आर्टस-कॉमर्स ॲण्ड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज (कुर्डूवाडी), मारुतीराव हरीराव महाडीक कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्स (मोडनिंब), कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर), समीर गांधी कला महाविद्यालय (माळशिरस) व विज्ञान महाविद्यालय (सांगोला).

सुटा की विद्यापीठ विकास मंच मारणार बाजी?

शिक्षक व पदवीधरमधील प्रत्येकी एक जागा आणि विद्यापरिषद व अभ्यास मंडळातील देखील काही जागा ‘सुटा’ने यापूर्वीच बिनविरोध जिंकल्या आहेत. मागील पाच वर्षांत विद्यार्थी हिताच्या दृष्टीने केलेल्या कामाच्या जोरावर पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून आम्हीच सर्व जागा जिंकू, असा दावा ‘सुटा’चे उमेदवार प्रा. सचिन गायकवाड यांनी केला आहे. दुसरीकडे विद्यापीठ विकास मंच आणि वालचंद समूहानेही विजयाचा दावा केला आहे. त्यांनी देखील विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विविध योजना व कामे केली जातील, अशी ग्वाही मतदारांना दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT